*अकोट मधील उच्चभ्रू रहिवासी असलेल्या अंबिका नगर येथील निष्क्रिय मानसिकता*….
असलेल्या अकोट वासियांचा सलाम असे म्हटले तर गैर होणार नाही त्याचे कारण म्हणजे संपूर्ण आकोट शहरामध्ये सर्वच प्रकारच्या दलित वस्ती मध्ये सुद्धा नाली रस्ते इतर सुविधा मिळवण्याकरिता तेथील लोकांचे संघटन पाहायला मिळते नगरपरिषद मधून किंवा बांधकाम व्यवसायिक यांच्याकडून नाली रस्ते इतर सुविधा करून घेण्याची जबाबदारी ही तेथील रहिवासी असलेल्या स्थानिकांवर असते परंतु दरवर्षी पावसाळ्यामध्ये अंबिकानगर या उच्चभ्रु रहिवासी असलेल्या कॉलनी मध्ये व गर्भश्रीमंत रहिवास असलेल्या पुष्प संकेत अपार्टमेंट मधील फ्लॅट धारक हे एवढे निष्क्रिय आहेत की तेथील रस्त्यांवर महिलावर्ग लहान मुले यांना रस्त्यावरून जाता-येता कमालीची कसरत करावी लागते चिखलामध्ये गाड्यांची घसरण जी नेहमी बघायला मिळते. रस्त्याची दुर्दशा खूपच जास्त प्रमाणात खराब झाली असून महिला वर्ग किंवा लहान मुले यांची जीवितहानी सुद्धा या रस्त्यामुळे होऊ शकते परंतु येथील रहिवाशी यांच्याकडून आपल्या कुटुंबाच्या सुरक्षेकरिता नगरपरिषद येथे जाऊन किंवा संबंधित बिल्डरला साधा प्रश्न सुद्धा विचारू शकत नाहीत. एवढी निष्क्रियता येथील रहिवासी गर्भश्रीमंत असणारे पुष्प संकेत अपार्टमेंट वाशीयांकडून दिसत आहे. यांच्या निष्क्रियतेमुळे आजूबाजूचे रहिवासी यांनासुद्धा नालीचा व त्यामुळे रस्त्याची झालेली दुर्दशा अशा अनेक अडचणीचा सामना करावा लागत आहे व त्यामुळे शेजाऱ्यांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे त्यामुळे उच्चभ्रू असणारे लोकांचा अशिक्षितपणा स्पष्ट दिसण्याचे हे अकोट मधील एकमेव उदाहरण आहे पखान हॉस्पिटल मध्ये येणारे जाणारे तसेच अकोट शहराच्या आजूबाजूचे खेड्यातील लोकांमध्ये सुद्धा या रस्त्याच्या दुर्दशेची व येथील रहिवाशी यांच्या निष्क्रिय पणाची कमालीची चर्चा होताना दिसत आहे. आदिवासी तांडा मधील लोकांना सुद्धा त्यांच्या अधिकाराची हक्काची जाणीव असते त्यांचे शिक्षण कमी असूनही त्यांना प्रशासनाकडून आपले अधिकार कसे मिळवता येतील याची माहिती असते परंतु पुष्प संकेत अपार्टमेंट मधील लोकांना आपल्या अधिकाराची माहिती नसावी तसेच आपल्या परिवाराची सुरक्षेची काळजी नसून आपल्यामुळे इतर शेजारी लोकांना त्रास होऊ नये याची जाणीव नसावी असा सूर अकोट वाशीयांकडून उमटत आहे