पत्नीचा खून करून पतीने केला आत्महत्येचा प्रयत्न
चांदूर बाजार च्या संगेकर नगर येथील घटना
प्रवीण झोलेकर
चांदुर बाजार शहरातील पोलीस ठाण्याच्या हद्दीत येणा – या संगेकर नगरमध्ये आज सकाळी महिलेच्या हत्येचे वृत्त पसरताच संपूर्ण शहरात खळबळ उडाली असून , कॉलनीत लोकांची गर्दी होऊ लागली पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार , आरोपी पती सतीश उर्फ राजेश काळबांडे ( वय 43 , रा . ” आहे . याने स्वतःची पत्नी श्रुतिका वय 37 वर्ष हिची निर्घृण हत्या करून आत्महत्येचा प्रयत्न केला आहे . हत्याचे मागचे कारण अद्याप समजले नसून पोलिसांनी आरोपीला तत्काळ ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी नेले , तेथून डॉक्टरांनी त्याला अमरावतीला रेफर केले पीएसआय प्रतिभा मेश्राम प्रशांत भाटकर , महेश काळे दाभाणे पुडील तपास करत आहेत .