रामटेक
रामटेक:
मौदा मार्गावरील किट्स कॉलेज जवळ शनि मंदिरामध्ये 29 व 30 मे ला श्री शनि जयंती महोत्सवाचा दोन दिवसीय कार्यक्रम उत्साहात सम्पन्न झाला. यावेळी विविध धार्मिक कार्यक्रम पार पडले.
29 मे ला सायंकाळी भजनाचा कार्यक्रम झाला. त्याचप्रमाणे 30 मे ला सकाळी शनिमुर्ती यांचा विधिवत अभिषेक करण्यात आला. सकाळी सार्वजनीक हवन पुजन होऊन सायंकाळी शनिदेव महाआरती व भक्ति संगीताचा कार्यक्रम झाला. त्यानंतर महाप्रसादाचा भक्तानि लाभ घेतला.