*शासन अंगणवाडी केंद्राच्या बाबतीत उदासीन*
भारत सरकार व सोबतच महाराष्ट्र सरकार यांचे धोरण देशातील येणाऱ्या नवीन पिढीचे भविष्य हे अंगणवाडी केंद्रातून सुरू होते याकरिता अनेक नवनवीन योजना व त्यासाठी लागणारा भरघोस निधी तळागाळातील लहान बालकांचा विकास व्हावा याकरिता प्रयत्नशील असते परंतु प्रत्यक्षात मात्र शासनाचे हे धोरण उदासीन असल्याचे दिसून येते कारण अकोला जिल्ह्यातील अकोट तालुक्यातील जैनपूर पिंप्री येथील अंगणवाडी केंद्राची शिकस्त परिस्थिती बघता शासनाच्या योजना फक्त फाईल मध्येच राहिल्यात की काय असा प्रश्न निर्माण होतो आहे. जैनपूर पिप्री येथील अंगणवाडी केंद्राला मुख्य दरवाजा पडक्या अवस्थेत आहे संबंधित पंचायत समिती जिल्हा परिषद ग्रामपंचायत अंगणवाडी केंद्राच्या बाबतीत एवढे उदासीन का आहेत. सरकारच्या योजनेचा लाभ अंगणवाडी केंद्राला का मिळत नाही. अंगणवाडी केंद्रातील बालके हे देशातील पुढील भविष्य आहे त्यांच्या जीवनाशी असा खेळ कशासाठी? असे अनेक प्रश्न जैनपूर पिंप्री येथील गावकऱ्यांकडून होत आहे..