अमरावती जिल्ह्यात आज वादळी वाऱ्यासह…
अमरावती जिल्ह्यात आज वादळी वाऱ्यासह अनेक ठिकाणी पावसाने हजेरी लावली. तर दर्यापूर शहरात आज दुपारी अचानक वादळाने कहरच केला. मुर्तीजापुर रोडवर असलेल्या वैभव मंगल कार्यालयाचे छप्पर उडाले, या मंगला कार्यालयात आयोजन असल्याने अनेक पाहुणे मंडळी यात जखमी झाली असून या जोरदार वादळामुळे अनेक कच्च्या घरांच्या पत्रे हवेत उडून गेले.
वैभव मंगल कार्यालयात विवाह सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. त्याची तयारी सुरू झाली होती. मात्र आज दुपारी वातावरणाने पालट केला. जोरदार ढगांसह आलेल्या सोसाट्याच्या वाऱ्याने वैभव मंगल कार्यालयाच्या छतावरील टिन उडाले, यामुळे पाहुणे मंडळीतील ४ ते ५ जण जखमी झाले. सर्व जखमींना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले.