कृ.उ.बा.स.अकोट व शेतकऱ्यांचे झालेले अतोनात नुकसान याला कोण जबाबदार ! मुख्य प्रशासक गजानन पुंडकर यांना पांडू पाटील खवले यांचा थेट सवाल..
Sagar Lohiya 14 Dec 2022
अकोट : मागील गेल्या ६ डिसेंबर पासून कृषी उत्पन्न बाजार समिती अकोट येथील कापूस खरेदी बंद आहे. कापूस व्यापारी व प्रशासक मंडळ यांच्यामध्ये सौदा पट्टीवर हलका माल परत असे लिहू नये यावरून गेली दहा दिवसापासून कापूस व्यापारी व प्रसारक मंडळ यामध्ये खंडाजंगी सुरू होती हा वाद सुरू असताना काही व्यापाऱ्यांची अडत परवाने सुद्धा तात्पुरती स्थगित करण्यात आली होती परंतु आज दिनांक 14 नोव्हेंबर 2022 ला सकाळी ८:३० वाजता डी डी आर यांच्या मध्यस्थीने सौदा पट्टीवर कोणताही मजकूर व्यापाऱ्यांनी लिहू नये असा तोडगा काढण्यात आला. परंतु हलका कापूस असल्यास वांदा कमिटी कडून त्याचा दुय्यम भाव ठरवणे असा आदेश मुख्य प्रशासक यांनी द्यावा असे प्रसिद्धी पत्रकच मुख्य प्रशासकाच्या आदेशाने सर्व जिनिंग प्रेसिंग मध्ये लावण्यात येईल. म्हणजेच सौदा पट्टीवर न लिहिता जिनिंग मध्ये कापूस वाहनातून खाली होत असताना आज पर्यंत चालत आलेल्या परंपरेनुसार हलका कापूस असल्यास वांदा कमिटी त्यामध्ये हस्तक्षेप करून कमी भावात कापूस घेतले जाणार. याचा अर्थ मागील दहा दिवसापासून कापूस खरेदी बंद ठेवून याचा काहीही उपयोग झाला नाही .
कृषी उत्पन्न बाजार समितीचा सुद्धा लाखो रुपयांचा महसूल बुडाला आहे. शेतकऱ्याचे झालेले नुकसान व बाजार समितीचा बुडालेला महसूल याची भरपाई कोण करेल? या सर्व नुकसानाची जबाबदारी कोण घेईल? बाजार समितीचे व शेतकऱ्यांना वेठीस धरून मागील दहा दिवसापासून झालेले नुकसानाची जबाबदारी ही मुख्य प्रशासक गजानन पुंडकर हे घेतील का? असा गंभीर प्रश्न पांडू पाटील खवले यांनी उपस्थित केला आहे.
प्रशासक मंडळींनी एवढा सर्व खटाटोप करूनही आज रोजी शेतकरी पॅनल व व्यापारी संघटनांचा विजय झाला पुन्हा एकदा व्यापारी संघटनांचे वर्चस्व अकोट बाजार समिती वर पहायला मिळाले अशा अनेक अटी शर्ती नुसार उद्यापासून दि.१५/१२/२०२२ सर्व व्यापारी मंडळी कडून नियमित कापूस खरेदी सुरू होईल अशी ग्वाही व्यापारी असोसिएशन चे अध्यक्ष प्रमोद चांडक, सचिव निखिल अग्रवाल, संतोष झुंझुनवाला दिलीप अग्रवाल दीपक अग्रवाल विकास अग्रवाल आनंद अग्रवाल राजेश केला अजित गुप्ता राजेश अग्रवाल प्रवीण चांडक नवीन चांडक विशाल गुप्ता किशोर लखोटिया धीरज चांडक संजय भुतडा निलेश पालीवाल नितीन अग्रवाल संजय आकोटकर महादेव वाकडे सुनील श्रावगी संदीप चौधरी चिराग शहा प्रतीक झुंझुनवाला रोमिल अग्रवाल यांच्या वतीने पत्रकार परिषदेमध्ये देण्यात आली.