तो, त्याचा नशा आणि तिचा सौदा! कहाणी ऐकून डोळ्यात टचकन येईल पाणी…
Ravi Raj 3 Nov 2022
बातमी आहे आपल्या शेजारी देश पाकिस्तानातील. यामध्ये होणाऱ्या बाळाची आई, त्याचं आयुष्य संपण्याची दररोज प्रार्थना करते, ज्याने तिचं आयुष्य कायमचं खराब केलं आहे.
Sad Story on Rukhsana : नवरा तिला केवळ मारहाण करत नव्हता तर तिच्या शरीराचा सौदा देखील करायचा. अतिशय कमी वयाच्या या मुलीने अशा सर्व गोष्टी पाहिल्यात ज्याचे ओरखडे तिच्या मनावर कायमचे कोरले गेलेले आहेत. तीला तिच्या आयुषयातील सर्व गोष्टी कायम एका वाईट स्वप्नाप्रमाणे तिला दिसत राहतील. तुम्ही तिची ही कहाणी ऐकाल तर तुमच्याही डोळ्यात पाणी आल्याशिवाय राहणार नाही. तीचं वय आहे अवघं 23 वर्ष. पण तिच्यासोबत ना तिचे आई वडील आहेत, ना तिच्या डोक्यावर तिच्या नवऱ्याच्या घराचं छत. लव्ह मॅरेज करून, डोळ्यात भावी आयुष्याची गुलाबी स्वप्न घेऊन ती सासरी गेली खरी. मात्र तिच्या आयुष्यात काय लिहून ठेवलंय याची तिला तिळमात्र कल्पना नसेल. तिला हेही ठाऊक नव्हतं की त्याच्या नवऱ्याची नशेची लत तिचं आयुष्य बरबाद करणार होती. या महिलेचं दुःख एका युट्युबरने व्हिडिओच्या माध्यमातून जगासमोर आणलं आहे. ज्यांनी हा व्हिडीओ पहिला त्यांच्या डोळ्यातही पाणी आलं.
आई वडिलांविरोधात जाऊन केलं लव्ह मॅरेज
रुखसाना सांगते की तिने लव्ह मॅरेज केलं होतं. आई वडिलांचा विरोध झुगारून तिने त्याच्यासोबत आयुष्य घालवण्याचा निर्णय घेतलेला. सुरुवातीला सर्व सुरळीत सुरु होतं. मात्र त्याच्या नशेची लत ज्या थरावर गेली त्यामुळे तिच्या काळजाचा थरकाप उडायचा. रुखसाना सांगते की लग्नानंतर तो नशा करायला लागलेला. तो दारू प्यायचा, चरसही घ्यायचा. एवढंच नाही तर तो हर प्रकारचा नशा करायचा. तो तिला बेदम मारहाण देखील करायचा. ती त्याच्याशी बोलायला गेली, की तो तिला फटकावायचा. एकवेळ त्यांच्याकडे पैसे नव्हते तर त्याने सर्व मर्यादा ओलांडल्या आणि थेट केला तिचा सौदा.
चरससाठी मित्रांसोबत बायकोचा सौदा
रुखसाना सांगते की एकदा त्याने चरस आणि सिगारेट साठी तिला त्याच्या मित्राच्या स्वाधीन केलं. एके दिवशी तो त्याच्या मित्राला घरी घेऊन आला आणि मला त्याच्यासोबत झोपायला सांगितलं. मी तसं करण्यास नकार दिला तर बेदम मारहाण केली. एवढंच नाही तर त्याच्या मित्रानेही तिला बेदम मारहाण केली आणि जबरदस्ती देखील केली. यानंतर तिने अखेर त्यापासून दूर जाण्याचा निर्णय घेतला. लव्ह मॅरेज केलं असल्याने तिला आई वडिलांनीही परत घरी आश्रय दिला नाही.
पाहा व्हिडीओ
लव्ह मॅरेजने दिलं आयुष्यभराचं दुःख
रुखसाना सांगते, मी दररोज तो मरावा ही प्रार्थना करते. त्याला असं मरण यावं जिथं त्याला कुणी पाणीही पाजायला नसावं. यानंतर ती सर्व मुलींना कधीही स्वतःच्या आवडीच्या मुलांशी लग्न करू नका असा सल्ला देते. हा व्हिडीओ ज्या युट्युबरने रेकॉर्ड केला त्याच्याही डोळ्यात पाणी आलं. रुखसाना तीन महिन्यांची प्रेग्नन्ट आहे. आज पोटात बाळ असताना तिच्याकडे डोक्यावरील छतही नाही.