*आसेगाव बाजार येथील ग्रामपंचायतचा भोंगळ कारभार आणि बेभान अधिकारी……….* आसेगाव बाजार येथील सोसायटी समोरील राजेश पाचडे यांच्या घराकडे जाणारा पूल सतत ब्लॉक झालेला असतो त्यामुळे नाली मधील सांडपाणी हे मुख्य रस्त्यावरून मार्ग काढत उलट्या दिशेने परिसरातील सर्वांच्या घरामध्ये शिरते तसेच मुख्य रस्त्यावरून ओलांडून नालीचे पाणी मार्ग काढून विरुद्ध दिशेने असलेल्या सोसायटीमध्ये व बाजूच्या गोडाउन मध्ये शिरते या दुर्गंधीयुक्त सांडपाणी मुळे परिसरातील सर्व लोकांना आरोग्यविषयक समस्या निर्माण होत असून डेंगू मलेरिया अशा रोगांना निमंत्रण व प्रोत्साहन मिळत आहे मागील अनेक दिवसापासून ग्रामपंचायत आसेगाव बाजार येथील संबंधितांना परिसरातील लोकांनी सूचना व तक्रारी केल्या असूनही आज पर्यंत लोकांच्या तक्रारीचे कुणीही दखल घेतली नाही ही समस्या परिसरातील रहिवाशी यांच्या आरोग्याच्या अनुषंगाने तसेच नाली मधील सर्व घाण दुर्गंधीयुक्त पाणी उलट्या दिशेने त्यांच्या घरात शिरत असल्यामुळे घरातील कुटुंबातील लहान-मोठे व्यक्तींना डेंगू मलेरिया व इतर अशा अनेक घातक बिमारी ना सामोरे जावे लागत आहे तसेच या परिसरातील लोकांच्या जीवनाशी हा आरोग्याचा जीवघेणा खेळ परिसरातील लोकांना अजून किती दिवस सहन करावा लागणार आहे की परिसरातील जनतेचा कुणी वाली राहिला नाही का? याला जबाबदार कोण ग्रामपंचायत मधील लोक प्रतिनिधी की बेभान असलेले अधिकारी असा प्रश्न उपस्थित होत आहे. Related Posts:अकोट रेल्वे स्टेशन वर पारध्यांचे वर्चस्व, तर एसटी…ॲम्बुलन्स अकोट वरून अकोला एका तासात कशी पोहोचणार..…Akot: मुन्ना अग्रवाल ची कार्यपद्धती संशयास्पद-…*अकोट मधील उच्चभ्रू रहिवासी असलेल्या अंबिका नगर…आसेगाव बाजार :येथील सेवा सहकारी सोसायटीमध्ये स्व.…अकोला: अकोट रेल्वे स्टेशनवर मूलभूत सुविधांचा…