2014 ची पुनरावृत्ती नको ! गुन्हे दाखल होण्याच्या भीतीने शरणागती-तब्बल दोन महिन्यानंतर खंडणी बहाद्दर संजय आठवलेचा माफीनामा..
Salim Khan 5 March 2024
Akot : 27 डिसेंबर 2023 ला पोलिस अधिक्षक अकोला यांना मोरे कुटुंबीयांनी तक्रार देऊनही अकोट पोलिसांना संजय आठवले चा माफीनामा घेण्यासाठी तब्बल दोन महिने तात्काळत वाट पाहावी लागली.. ही आश्चर्याची बाब आहे.. कारवाई टाळण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न संजय आठवले यांने या दोन महिन्यात केलेले असावेत..
अखेर कोणत्याही प्रयत्नाला यश येत नसल्याचे संजय आठवले च्या ध्यानात आल्यामुळे पोलिसांसमोर शरण जाणे हाच एकमेव पर्याय असल्यामुळे गुन्हे दाखल झाल्यापेक्षा माफीनामा बरा.. असे शहाणपणाचे काम संजय आठवले ने केले..
पंतप्रधान नरेंद्र मोदीचे सुद्धा शब्द चुकतात असा उल्लेख करून लोकांना पटवून देण्याचा बालिश प्रयत्न हा संजय आठवले यांने केला परंतु अशाच प्रकरणात राहुल गांधी यांना दोन वर्षाची शिक्षा व सोबतच खासदारकी सुद्धा गमवावी लागली होती.. हाच संदर्भ संजय आठवले करिता लागू होत असल्यामुळे भीतीपोटी दोन महिन्यानंतर पोलिसांसमोर शरणागती पत्करून रविराज मोरे यांच्या कुटुंबीयांना माफी मागण्याचा बालिश प्रयत्न केला आहे..
तसेच 138 च्या केस मध्ये फिर्यादी असो वा आरोपी शशिकांत अग्रवाल असो की डॉ. जपसरे किंवा रविराज मोरे कायद्यानुसार शिक्षा सुनावल्यानंतर लगेच त्याच वेळी जामीन होऊन 30 दिवसाची मुदत वरिष्ठ कोर्टात दाद मागण्याकरिता मिळते.. त्यामुळे सुप्रीम कोर्टापर्यंत केस लढण्याची मुभा आरोपी व फिर्यादी यांना मिळत असते.. त्यामुळे कुणालाही फरार राहण्याची गरज नाही.. यावरून संजय आठवले याचा पत्रकारितेतील अभ्यास कमी असल्याचे जाणवते..
तसेच काही दिवसापूर्वी झालेल्या नवीन तहसील इमारतीचे उद्घाटन हा शासकीय कार्यक्रम असल्यामुळे यामध्ये शहरातील सर्व सन्माननीय पत्रकार मंडळींना निमंत्रण होते.. परंतु निमंत्रण नसल्यामुळे नैराश्यातुन जळफळाट झालेल्या पत्रकाराचा व आमदार प्रकाश भारसाकळे यांच्या विरोधात सततच्या नकारात्मक बातमीचा परिणाम हा शून्य होऊन आपल्या सर्व मेहनतीवर पाणी फिरले म्हणून त्याचा राग सुद्धा यशस्वी झालेल्या कार्यक्रमाच्या माध्यमातून संजय आठवले कडून व्यक्त होताना दिसत आहे.. स्वतःला सज्जन पणाचा आव आणीत मी किती सज्जन पत्रकार आहे हे दाखवण्याचा प्रयत्न संजय आठवले करीत आहे.. परंतु 2014 मध्ये एका गरीब शेतकऱ्याला दहा लाख रुपयांची खंडणी मागितल्याची रेकॉर्डिंग असल्याचेही स्पष्ट झाले असून संजय आठवले विरोधात गंभीर गुन्हे डी वाय एस पी रश्मी नांदेडकर यांच्या कारकिर्दीत दाखल झालेले आहेत..त्यामुळे भविष्यात संजय आठवले विरोधात अजून अनेक काही आश्चर्यकारक बाबी समोर येणार आहेतच..