अमरावती जिल्ह्यातील चांदुर बाजार तालुक्यातील घाटलाडकी येथील १२
अमरावती जिल्ह्यातील चांदुर बाजार तालुक्यातील घाटलाडकी येथील १२ वर्षाच्या मुलीचा कोरोना मुळे दुर्देवी मृत्य झाल्याची घटनासमोर आली आहे. या मुलीवर अमरावतीच्या कोविड रुग्णालयात उपचार सुरु होते. चांदुर बाजार तालुक्यातील घाटलाडकी येथील १२ वर्षाच्या मुलीवर कोविड रुग्णालयात उपचार सुरु होते २५ एप्रिल रोजी या मुलीला कोविड हॉस्पिटल ला उपचारासाठी भरती करण्यात आले होते.
या मुलीला अन्य आजार हि होते. त्यात तिची कोरोना चाचणी पॉझेटिव्ह आली. त्यानंतर तिच्यावर कोविड रुग्णालयात उपचार करण्यात आले. मात्र उपचारा दरम्यान गुरुवारी तिचा मृत्यू झाला. १९ मार्च नंतर कोरोना मुळे हा पहिला मृत्यू जिल्ह्यात झालेला आहे. सध्या कोरोना ची स्थिती पाहता जिल्ह्यात कोणताच रुग्ण हा कोरोना पॉझेटिव्ह नाही. मात्र या मुलीला कोरोना ची लागण कुठून आणि कशी झाली याचा तपास आरोग्य यंत्रणा करीत आहे.
देशात पुन्हा एकदा कोरोना रुग्णसंख्या लक्षणीयरित्या वाढताना दिसत आहे. गेल्या २४ तासांत देशात ३,३७७ नवे कोरोना रुग्ण आढळून आले आहेत. आरोग्य मंत्रालयाच्या माहितीनुसार देशात सध्या सक्रिय कोरोना रुग्णांचा आकडा १७,८०१ इतका झाला आहे.