hacklink al hack forum organik hit kayseri escort jojobet 1019deneme bonusu verendeneme bonusu veren sitelermarsbahis 463deneme bonusu veren sitelersahabetdeneme bonusu veren sitelerviagra onlinebonus albaşiskele escortbahis1000Mostbetbahis ve casino oyunları1windeneme bonusu veren sitelercasbommatadorbetcasibom girişonwin girişpusulabetgüvenilir bahis siteleri slot oyunları deneme bonusu veren bahis sitelericashback bahis girişcashback bahis girişonwin

INDIA NEWS

Press

भारतातील या सर्वात हुशार चोराने चक्क बनावट न्यायाधीश बनून दोन महिने निर्णय सुनावले होते जवळपास दोन हजार कैद्यांना जामीनावर मुक्त केले

Ravi Raj 24 Dec 2022

कोर्टात जज बनून दोन महिने निर्णय सुनावणारा चोर राम मित्तल

धनी राम मित्तल या व्यक्तीला तुम्ही कदाचित ओळखत नसाल किंवा त्याचे नावही तुम्ही कधी ऐकले नसेल. हा कुणी सेलिब्रेटी, सिनेसृष्टीतील चेहरा किंवा कुठला नामवंत नेता नाही. धनी राम मित्तल हा एक चोर आहे. असा चोर ज्याने चक्क भारत सरदारही फसवले आहे. त्याचे कारणानेच असे आहेत की त्याच्या कारनाम्यांबद्दल जाणून घ्यायला आपण उत्सुक व्हाल. धनी राम हा भारतातील सर्वात हुशार चोर मानला जातो.

धनी राम मित्तल हा काही साधसुद्धा चोर नव्हता. त्याच्याकडे एलएलबी, हस्ताक्षर तज्ञ आणि ग्राफोलॉजी विषयातील पदव्या होत्या. वयाच्या २५ व्या वर्षीच त्याने चोरी आणि फसवणूक हा आपला पेशा बनवला होता. ६० च्या दशकापासून ९० च्या दशकापर्यंत त्याने देशात अनेक चोऱ्या आणि फसवणूकीचे प्रकार केले. भारतात चोरीच्या घटनांमध्ये सर्वाधिक वेळा अटक झालेला तो एकमेव चोर आहे. यापूर्वी २०१६ मध्ये पोलिसांनी त्याला अटक केले होते, परंतु तो पोलिसांना चकमा देऊन फरार झाला.

या हुशार चोराबद्दल असे सांगितले जाते की तो फक्त दिवसाढवळ्याच चोऱ्या करतो. त्याने आतापर्यंत १००० हून अधिक गाड्या चोरल्या आहेत. आपल्या हुशारी आणि शिक्षणाच्या जोरावर हा चोर लोकांना आपल्या जाळ्यात अडकवून त्यांच्या गाड्या चोरायचा आणि नंतर बनावट कागदपत्रे बनवून त्या विकायचा.

वारंवार चोरीच्या प्रकरणात सापडणाऱ्या मित्तलला जेव्हा पोलिसांनी कोर्टात आणले, तेव्हा त्याला वारंवार आपल्या कोर्टात पाहून तिथले जजही त्याला “इथून चालता हो” म्हणाले होते. तिथूनही न्यायाधीशांनी मला जायला सांगितलंय असं म्हणून मित्तल पोलिसांना गुंगारा देऊन फरार झाला होता.

धनी राम मित्तलचा सर्वात अचंबित करणारा कारनामा म्हणजे त्याने बनावट कागदपत्रे बनवून हरियाणामधील झज्जर कोर्टाच्या अतिरिक्त विशेष न्यायाधीशाला जवळपास दोन महिन्यांच्या सुट्टीवर पाठवले होते आणि त्यांच्या जागेवर स्वतः न्यायाधीश म्हणून रुजू झाला होता. त्याने जवळपास दोन महिने बनावट न्यायाधीश बनून कोर्टाचे निर्णय सुनावले.

या दरम्यान त्याने जवळपास २००० कैद्यांना जामिनावर मुक्त केले. तसेच अनेक गुन्हेगारांना शिक्षाही सुनावल्या. या बनवटगिरीचा संशय येण्याआधीच धनी राम मित्तल तिथूनही पसार झाला. त्यानंतर त्याने जामिनावर मुक्त केलेल्या सर्व आरोपींना पुन्हा ताब्यात घेण्यात आले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

en_USEnglish