INDIA NEWS

Press

मी गावाचा विकास होऊच देणार नाही ! शिवसेनेचे जि.प.सदस्य जगन निचळ यांचे नवनिर्वाचित सरपंच दिगंबर पिंपराळे यांना थेट आव्हान..

सर्वसामान्य माणूस ते थेट जनतेतून सरपंच
दिगंबर पिंप्राळे यांनी केली अजब किम
या ..

Lalit Nagrale 26 Dec 2022

डीएसपी यांचे पडक्या स्थितीत असलेले घर

अकोट : तालुक्यातील महत्वाच्या समजल्या जाणाऱ्या आकोलखेड ग्रामपंचायत निवडणूकीत सरपंच पदी वंचित बहुजन आघाडीचे दिगंबर पिंप्राळे यांचा विजय झाला आहे.तर सेनेचे विद्यमान जिल्हा परिषद सदस्य यांच्या मातोश्री चा दारुण पराभव झाला आहे.

नवनिर्वाचित सरपंच डीएसपी उर्फ दिगंबर पिंपराळे

विशेष म्हणजे प्रचार सुरू असताना जाहीर सभेत जि.प.सदस्य यांनी माझ्या मातोश्री रत्नप्रभा निचळ यांनाच निवडून द्यावे अन्यथा दिगंबर पिंप्राळे यांना निवडून दिल्यास मी अकोलखेड गावामध्ये कोणताही निधी येऊ देणार नाही किंवा पुढील पाच वर्ष गावाचा विकास होऊ देणार नाही असे आव्हानच विद्यमान जगन निचळ यांनी नवनिर्वाचित दिगंबर पिंपराळे यांना दिले आहे तरीसुद्धा अकोलखेड वासियांनी कोणत्याही धमकी व दबावाला बळी न पडता दिगंबर पिंपराळे यांना १८९२ मते दिली तर निचळ यांना १४४९ मते मिळाली (डीएसपी) दिगंबर पिंपराळे यांचा सर्वाधिक ४४३ मतांनी विजय झाला.

इलेक्ट्रिसिटी नसलेले पिंपराळे यांचे घर

मागील वर्षी पिंप्राळे यांनी अकोलखेड पंचायत समितीची निवडणूक लढविली होती.त्यामध्ये त्यांना समान मते मिळाली होती.दिगंबर पिंप्राळे यांनी सरपंच पदाकरीता निवडणूक लढविताना एक रुपया देखील खर्च केला नाही.त्यांच्यामागे असलेली जनशक्ती मतांच्या रुपाने दिसून आली.पिंप्राळे हे घर,दार,विज नसलेले महाराष्ट्रातील एकमेव उमेदवार होते.त्यांच्याकडे स्मार्टफोन देखील नाही.एक सर्वसामान्य माणूस ते थेट गावचे जनतेच्या मनातील सरपंच पदापर्यंत पोहोचले.आकोलखेड ग्रामपंचायत निवडणूकीत बहुजन पॅनल विरुद्ध विकास पॅनल अशी थेट लढत होती.जनशक्ती विरुद्ध धनशक्ती या निवडणूकीत पहायला मिळाली.दिगंबर पिंप्राळे यांच्या रुपाने वंचित बहुजन आघाडीचा उदय झाल्याचे निवडणूकीच्या एकंदरीत चित्रावरून दिसून आले. विकास पॅनलची एक जागा अविरोध झाल्याने १३ सदस्य संख्या असलेल्या ग्रामपंचायत मध्ये १२ सदस्य पदाकरिता निवडणूक झाली. बहुजन पॅनलचे १२ विरुद्ध विकास पॅनलचे १२ व ५ अपक्ष असे एकूण २९ उमेदवार निवडणूकीच्या रिंगणात होते.बहुजन पॅनलला १० जागा मिळाल्या तर विकास पॅनल ला ३ जागांवर समाधान मानावे लागले.

शिवसेनेचे विद्यमान जि प सदस्य जगन निचळ

दिगंबर पिंपराळे हे वंचित बहुजन आघाडीचे अधिकृत उमेदवार सरपंच असून जि प अकोला येथे सुद्धा वंचित बहुजन आघाडीचे वर्चस्व असल्याने सहाजिकच डीएसपी यांना गावाचा विकास हा वेगाने करण्याची संधी या निमित्ताने प्राप्त झाली आहे परंतु डीएसपी यांचे प्रतिस्पर्धी शिवसेनेचे विद्यमान जि प सदस्य जगन निचळ यांना त्यांच्या आईचा पराभव खूपच जिव्हारी लागल्यामुळे त्यांनी डीएसपी यांना पुढील पाच वर्षात गावाचा विकासच मी होऊ देणार नाही असे खुले चॅलेंजच दिले आहे त्यामुळे पुढील पाच वर्षात दिगंबर पिंपराळे यांच्यासमोर जगन निचळ हे अनेक अडचणी निर्माण करतील हे निश्चित आहे. तरी दिगंबर पिंपराळे यांना एवढा तगडा विरोध असूनही लोकांच्या अपेक्षा व गावाचा विकास कसा साधतात हे पाहणे औत्सुक्याचे ठरेल..

One thought on “मी गावाचा विकास होऊच देणार नाही ! शिवसेनेचे जि.प.सदस्य जगन निचळ यांचे नवनिर्वाचित सरपंच दिगंबर पिंपराळे यांना थेट आव्हान..

  1. तुमच्या सर्व बातम्या महत्त्वाच्या आणि बरोबर आहेत, मी त्या वेबसाईटवर करतो, त्यासाठी app आहे का?

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

en_USEnglish