आकोट : नंदीपेठ येथील नंदीकेश्वर मंदीरात श्री संत पुजाजी महाराज यांच्यापुण्यतीथी निमीत्य भव्य दिव्य एकनाथी भागवत पारायण व अखंड हरीनाम सत्ताह संपन्न..
Sachin Kale 23 Jan 2023
आकोट : शहरातील नंदीपेठ येथे सालबाद प्रमाणे श्री संत पुजाजी महाराज पुण्यतीथी निमीत्त भागवत पारायण व विविध धार्मीक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात येत असते. ही परंपरा कायम चालत आलेली आहे त्याचप्रमाणे दरवर्षीप्रमाणे यावर्षी सुद्धा ऐकनाथी भागवत पारायन व अखंड हरीनाम सत्ताहाचे भव्य दिव्य आयोजन 16 जानेवारी पासुन शहरातील नंदीपेठ येथे असंख्य भाविकांच्या श्रद्धेने पार पडत आहे या कार्यक्रमाची सांगता दि 23 जानेवारी रोजी अतिशय गोड किर्तनाने व महाप्रसादाने करण्यात आली या सात दिवसाच्या सप्ताह मध्ये अनेक नामवंत किर्तनकार यांनी आपले अनमोल वचन कीर्तनाच्या माध्यमातून भक्तांना दिले आहेत तर व्यासपीठाचे नेत्तुत्व हरिभक्त पारायण अशोक महाराज राजगुरु यांनी केले तर राज्यातील अनेक प्रतिष्ठित व अभ्यासू कीर्तनकार हभप ञ्यबंक महाराज अवारे हभप हिरालाल महाराज काळमेघ हभप गोपाल महराज भुस्कट हभप भाणुदास महाराज वरखेडे हभप कोडींराम महाराज बोर्डीकर हभप वासुदेव महाराज खोले गुरुजी हभप वैभव महाराज तराळ यांचे कीर्तनाच्या माध्यमातून मार्गदर्शन लाभले असून कार्यक्रमाचा शेवट हभप अशोक महाराज राजगुरु यांचे काल्याचे किर्तनाने संपन्न झाला आहे. संत पुंजाजी महाराज मंदीर हे प्राचीन काळातील असुन या मंदीरात अनेक धार्मीक कार्यक्रम नंदीकेश्वर भजनी मंडळ सतत सहभागी असुन यशस्वी साथ देत असतात सर्व नंदीपेठवासी सदर कार्यक्रमात गुण्यागोविंदाने सहभागी होवुन वारकरी सांप्रदायाचा आनंद घेत असतात
सदर कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी सचीन काळे सह अनेक समाजसेवक यांनी पुढाकार घेत रात्रंदिवस अथक परीश्रम घेवुन कार्यक्रम अतीशय शिस्तबद्ध पार पाडला व सचिन काळे यांनी कार्यक्रमात सहभागी असलेले कीर्तनकार आयोजक प्रत्यक्ष व अप्रत्यक्ष सहकार्य लाभलेले सर्व भक्तांचे आभार मानले असून असाच भव्य दिव्य कार्यक्रम यापुढेही वर्षानुवर्षे चालत राहावा ही सदिच्छा सचिन काळे यांनी व्यक्त केली आहे.