INDIA NEWS

Press

“अवघ्या महाराष्ट्राला प्रोत्साहन देणारी सर्वोत्कृष्ट ऐतिहासिक कामगिरी”! इरफान अहमद सरदेशमुख “तलाठी” यांची किमया..

RaviRaj 3 Jan 2023

तलाठी इरफान अहमद सरदेशमुख

अकोट : तालुक्यातील अनेक मोठ्या लोकसंख्येच्या गावांमध्ये तलाठी या पदावर अतिशय महत्त्वाची जबाबदारी पार पाडणारे व लोकांशी नाळ जुळलेले इरफान अहमद सर देशमुख यांनी मागील तीन वर्षापासून आसेगाव बाजार येथील कार्यभार सांभाळलेला आहे आसेगाव बाजार हे जि.प. सर्कल असून खूप मोठ्या लोकसंख्येचे गाव आहे

अकोट तालुक्यातील सर्व राजकीय घडामोडी मध्ये आसेगाव बाजारचा सर्वात मोठा सहभाग असतो. इरफान अहमद सरदेशमुख हे नेहमी हसतमुख असणारे व्यक्तिमत्व असून गावातील प्रत्येक व्यक्तीसोबत देशमुख यांची नाळ जुळलेली आहे मोदी सरकार अस्तित्वात आल्यापासून शेती विषयक व तलाठी संबंधित जवळपास सर्वच कामकाज हे ऑनलाइन द्वारे केल्या जाते त्यामुळे अनेक शेती विषयक मोबाईल ॲप वापरणे गरजेचे झाले आहे शेती विषयक माहिती ही मोबाईल ॲप द्वारे प्रत्येक शेतकऱ्याला स्वतः भरावी लागते अशा अनेक योजना डिजिटल इंडियाच्या माध्यमातून शेतकऱ्यापर्यंत पोहोचण्याचे काम सरकार करत असतेच परंतु यामध्ये प्रत्येक माणसापर्यंत सर्व माहिती योग्य पद्धतीने पोहोचवणे तळागळातील प्रत्येक व्यक्तीचे समाधान करणे मोबाईल ॲप मधील त्रुटी दूर करून जास्तीत जास्त लोकांना अनेक योजनांचा फायदा मिळवून देण्याचे काम देशमुख यांनी केले आहे

इरफान अहमद सर देशमुख यांनी गावातीलच नाही तर संपूर्ण तालुक्यातील लोकांशी संयमाने प्रेमाने व नेहमी सहकार्याची भावना ठेवून लोकांना टॅक्स भरण्याकरिता आनंदाने प्रवृत्त करून जानेवारी महिन्याअखेरच 100% टॅक्स वसुली करण्याचा एक ऐतिहासिक विक्रमच देशमुख यांनी रचला आहे त्यामुळे वर्षानुवर्षे थकलेला टॅक्स वसूल करण्यासाठी अनेक तलाठी कर्मचाऱ्यांची दमछाक होते परंतु नेहमी नम्र स्वभावाचे, स्मितभाषी अशा सर्व गुणसंपन्न असणारे देशमुख यांनी शंभर टक्के टॅक्स वसुली अगदी सहजरित्या त्यांच्या कार्यशैलीमुळे शक्य झाले असून महाराष्ट्रातील सर्व तलाठी मंडळींना देशमुख यांनी एक आदर्श ठेवला आहे त्यामुळे इरफान अहमद सरदेशमुख यांच्या कार्यांचे सर्वत्र कौतुक होत आहे..

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

en_USEnglish