INDIA NEWS

Press

संत रोहिदास महाराज जनमाणसाला दिशा देणारे – दिगंबर पिंप्राळे

आकोलखेड ग्रामपंचायत कार्यालयात संत रोहिदास महाराज जयंती साजरी

Lalit nagrale 5 Feb 2023

अकोलखेड ग्रामपंचायतसंत रोहिदास महाराज जयंती कार्यक्रम

अकोट : मन चंगा तो कठोती में गंगा असा संदेश ६०० वर्षांपूर्वी देणारे संत रोहिदास महाराज जनमाणसाला दिशा देणारे असे प्रतिपादन आकोलखेड सरपंच दिगंबर पिंप्राळे यांनी प्रमुख मार्गदर्शक म्हणून बोलताना केले.कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सोसायटीचे संचालक डॉ.प्रभाकर नगराळे हे होते.तर ज्येष्ठ नागरिक राधेश्याम झाडे, सोसायटीचे अध्यक्ष दादाराव तायडे,ग्रा.पं.सदस्या पार्वती पदमणे,ग्रा.पं.सदस्य दिनेश गाठेकर,मदन सावळे,अ.जहिद अ.शहिद,रामदास गव्हाळे,रंगराव गावंडे,ज्ञानेश्वर देऊळकर,पोलिस पाटील अमरनाथ शेगोकार, सदानंद सिरसाट यांची प्रमुख उपस्थिती होती.

संत रोहिदास महाराज यांच्या ६२५ व्या जयंतीचे आयोजन ग्रामपंचायत कार्यालयात सकाळी ११वाजता करण्यात आले होते.कार्यक्रमाच्या सुरुवातीला संत रोहिदास महाराज यांच्या प्रतिमेचे पूजन करुन हारार्पण मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले.प्रमुख अतिथी राधेश्याम झाडे व कार्यक्रमाचे अध्यक्ष डॉ.प्रभाकर नगराळे यांनी संत रोहिदास महाराज यांच्या जीवन कार्यावर प्रकाश टाकला.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार आशिष गव्हाळे यांनी मानले.कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी मंगेश देऊळकर,गजानन तायडे,गोपाल धुळे,प्रमोद खंडारे, नंदकिशोर चांदूरकर,रामदास ताडे,रितेश नाथे,रामा लव्हाळे,प्रविण गाठेकर,विशाल खंडारे आदींनी अथक परिश्रम घेतले

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार आशिष गव्हाळे यांनी मानले.कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी मंगेश देऊळकर,गजानन तायडे,गोपाल धुळे,प्रमोद खंडारे, नंदकिशोर चांदूरकर,रामदास ताडे,रितेश नाथे,रामा लव्हाळे,प्रविण गाठेकर,विशाल खंडारे आदींनी अथक परिश्रम घेतले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

en_USEnglish