पशुसंगोपण व दुग्धव्यवसाय जिव्हाळ्याचा विषय – राहुल अडाणी..
Lalit nagrale 2 March 2023
अकोट :
तालुक्यातील मौजे ताजाणापुर हे गाव पशुपालकांचे गाव म्हणून ओळखल्या जाते. म्हणूनच पशुपालकांना योग्य ते तांत्रिक व अद्ययावत पशुसंगोपणाचे ज्ञान मिळावे याकरिता कृषि तंत्रज्ञान व्यवस्थापन यंत्रणा आत्मा अकोट यांचे अंतर्गत गावात कृषी विज्ञान केंद्र अकोला यांचे तांत्रिक साहाय्याने दुग्धोत्पादन व चारा प्रक्रिया या विषयावरील शेतिशाळेच्या वर्गात बोलत असताना आत्माचे सहाय्यक तंत्रज्ञान व्यवस्थापक राहुल अडाणी यांनी शेतकऱ्यांचा अतिशय जवळचा आणि जिव्हाळ्याचा जोडव्यवसाय म्हणजे पशुपालन आणि दुग्धोत्पादन असल्याचे सांगितले. शेतीशाळेचे आयोजन जिल्हाधिकारी निमा अरोरा, प्रकल्प संचालक आत्मा आरिफ शाह यांचे मार्गदर्शनात करण्यात आले होते.यावेळी मार्गदर्शक म्हणून कृषी विज्ञान केंद्र अकोला चे विषय विशेषज्ञ डॉ.गोपाल मंजुळकर, कृषी तंत्रज्ञान व्यवस्थापन यंत्रणा आत्मा अकोट चे तालुका तंत्रज्ञान व्यवस्थापक निलेशकुमार नेमाडे व कृषी सहाय्यक राजू राजूरकर यांनी प्रामुख्याने उपस्थिती होती. निलेश नेमाडे यांनी शेतीशाळेची संकल्पना विषद करून गावातील पशुपालकांनी शेतिशाळेचा लाभ घेण्याचे आवाहन शेतकऱ्यांना केले. डॉ.मंजुळकर यांनी दुग्धयावसायकरिता गाय आणि म्हैस यांच्या विविध प्रजातींची माहिती, त्यांचे आरोग्य, प्राण्यांचा गोठा, त्यांचे प्राथमिक देखरेख यासोबतच चारा प्रक्रिया याबाबत मार्गदर्शन केले.शेतीशाळा वर्गाचे संचालन करीत राजू राजूरकर यांनी उपस्थितांचे आभार व्यक्त केले. शेतीशाळे करीता बहुसंख्य पशुपालकांनी उपस्थिती दर्शविली.