पुणे : प्रफुल महाराज कुलकर्णी यांची महाराष्ट्र राज्य शिवसेना शिक्षकेतर कर्मचारी सेना पुणे शिरूर तालुका संघटक पदी नियुक्ती – संपूर्ण राज्यभरातून शुभेच्छांचा वर्षाव..
RaviRaj 7 March 2023
पुणे -शिरूर येथील प्रफुल महाराज कुलकर्णी यांचे मजबूत संघटन व प्रभावी भाषाशैली आणि संघटनाचा दांडगा अनुभव असल्यामुळे तसेच महाराष्ट्र राज्य त्यासोबतच संपूर्ण देशात त्यांची अनेक विविध संघटनांच्या माध्यमातून पाळेमुळे रोवली आहेत प्रफुल महाराज यांनी आपले संपूर्ण आयुष्य समाजाची सेवा करण्यातच खर्ची घातले आहे. यामध्ये अनेक संकटाचा सामना करीत कठीण प्रसंगातून मार्ग काढीत खूप मोठी त्यागाची पार्श्वभूमी प्रफुल महाराज यांच्या पाठीमागे राहिली आहे. तरीही सर्व संकटावर मात करीत या कठीण प्रसंगातून अनेक संघटनांना उभारी देण्याचे काम कोणत्याही फळाची आशा न करता प्रफुल महाराज यांनी केले आहे.
अशा स्वच्छ प्रतिमा असलेले व समाजासाठी सदैव धडपडणारे प्रफुल महाराज यांच्या कार्याची दखल घेत महाराष्ट्र राज्याचे लाडके मुख्यमंत्री श्री एकनाथ शिंदे यांच्या आदेशानुसार हिंदुह्रदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या आशीर्वादाने श्री अनिल पडवळ अध्यक्ष- महाराष्ट्र राज्य शिवसेना शिक्षकेतर कर्मचारी सेना यांच्या नेतृत्वाखाली पुणे शिरूर तालुका संघटक पदी प्रफुल महाराज कुलकर्णी यांची नियुक्ती झाली हा क्षण पुणे शिरूर च नाही तर संपूर्ण महाराष्ट्र राज्यासाठी आनंदाचा क्षण आहे …त्यामुळे संपूर्ण महाराष्ट्र राज्यातूनच नव्हे तर देशाच्या कानाकोपऱ्यातून प्रफुल महाराज यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव होत आहे व पुढील कार्यासाठी या नियुक्तीमुळे प्रफुल महाराजांना बळ मिळेल ही अपेक्षा सर्व सामान्यांकडून व्यक्त होत आहे..