अकोट: गीतानगर वाशी यांची होळीच्या निमित्ताने आपुलकीचे व माणुसकीचे नाते निर्माण करणारी अनोखी परंपरा-नवीन पिढी समोर एक उत्तम आदर्श..
RaviRaj 7 March 2023
आज संपूर्ण देशात होळी साजरी होत आहे अनेक जाती धर्मीय वेगवेगळ्या लोकांच्या होळी साजरी करण्याच्या स्वतंत्र परंपरा असतात व त्या वर्षानुवर्षे जपण्याचे काम समाजातील प्रत्येक घटकाची जबाबदारी असते होळी हा सण फक्त रंग उधळण्याचा नसतो तर समाजातील सर्व घटकांपर्यंत आपुलकी प्रेम भावना एकमेकांप्रती आदर निर्माण करण्याचा एक प्रसंग असतो त्याप्रमाणे अकोट येथील उच्चभ्रू लोकांची कॉलनी ओळखली जाणारी गीता नगर मध्ये दरवर्षीप्रमाणे यावर्षी सुद्धा होळीच्या निमित्ताने अहंकार, कटूता अशा अनेक वाईट प्रकारच्या प्रवृत्तींचे दहन होळीमध्ये करून सर्वत्र एकमेकांप्रती आपुलकीची व आदराची भावना निर्माण करण्याचा प्रयत्न गीतानगर वाशियांकडून होत असतो
यामध्ये सर्व बालगोपाल महिला मंडळी पुरुष व वृद्धांपर्यंत एकत्र येऊन मनसोक्त होळीचा आनंद घेतला त्यामध्ये बालगोपाल व महिला यांचा संगीत खुर्ची खेळण्याचा आनंद व त्यांचा उत्साह हा मनमोहक ठरला तसेच उच्चभ्रू कॉलनी असूनही अॅड दीपक कुटे, डॉ पखान डॉ. शिकवाल, संतोष चांडक, कीर्ती कुमार वर्मा ,दीपक सदरानी, धीरज चांडक, प्रतीक चांडक, कुशल चांडक, विजय चांडक, प्रभाकर पांडे, तुषार टावरी, मयूर टावरी, मनीष चांडक, तरडेजा जी,अशोक वर्मा ,गणेश जी चांडक, हितेश कोटक, मंगळे सर, कमल किशोर मालानी व ओम शांति सेंटर मधील ब्रह्मकुमारीज या सर्व आदरणीय मंडळींनी सहपरिवार उपस्थिती दर्शवित होळीचा आनंद द्विगुणित केला व सर्व पुरुष व महिला मंडळी यांनी होळीच्या गाण्यावर ठेका धरीत मनसोक्त डान्स करीत नवीन पिढी समोर एक नवा आदर्श निर्माण केला.
या कार्यक्रमाचे आयोजन सर्व गीतानगर निवासी यांनी केले अनेकांनी प्रत्यक्ष व अप्रत्यक्ष श्रम घेतले त्याबद्दल सर्व सन्माननीय मंडळींना आवाहन करीत ही परंपरा कायम राहावी अशा होळीच्या शुभेच्छा देऊन आयोजकांनी सर्वांचे आभार मानले…