राज्यातील नायब तहसीलदार संघटना यांची राजपत्रित वर्ग दोन चे ग्रेड पे वेतन मिळण्याची मागणी-आज राज्यभर होणार एक दिवसीय रजा आंदोलन..
RaviRaj 13 March 2024
अकोला : महाराष्ट्र राज्यातील महसूल विभागातील नायब तहसीलदार, राजपत्रीत वर्ग-२ हे अत्यंत महत्वाचे पद आहे. परंतु नायब तहसीलदार या पदाचे वेतन राजपत्रीत वर्ग-२ चे नसल्याने महाराष्ट्र राज्य तहसीलदार, नायब तहसीलदार संघटना यांनी नायब तहसीलदार यांचे ग्रेड पे वाढविण्याबाबत सन १९९८ पासुन आजपर्यत शासनाकडे वारंवार पाठपुरावा करुनही संघटनेच्या मागणीचा शासन स्तरावर कोणताही विचार करण्यात आलेला नाही. तसेच या संदर्भात कोणतीही माहिती शासन स्तरावरुन अद्यापही देण्यात आलेली नाही. या पार्श्भूमीवर अकोला जिल्ह्यातील सर्व …उपजिल्हाधिकारी,तहसीलदार ,नायब तहसिलदार विभागीय सचिव प्रा संजय खडसे व जिल्हाध्यक्ष सुनील पाटील यांच्या मार्गदर्शनात विभागीय आयुक्त कार्यालय अमरावती येथे दि.१३/०३/२०२३ रोजी एक दिवसीय सामूहिक रजा आंदोलन अंतर्गत विभागीय आयुक्त अमरावती यांना निवेदन देण्यासाठी उपस्थित होणार आहेत.