आसेगाव बाजार शाळा लोकार्पनाचा उडाला फज्ज़ा-जिल्हाधिकाऱ्यांनी फिरवली पाठ! ग्रामस्थांचा अघोषित बहिष्कार तर उपोषण मागे..
Rohit dhande 11 may 2023
आकोट तालुक्यातील आसेगाव बाजार येथील जिल्हा परिषद शाळेच्या नूतन ईमारत लोकार्पण सोहळ्यावर ग्रामस्थांचा अघोषित बहिष्कार आणि लोकार्पण सोहळ्याकरिता येणाऱ्या जिल्हाधिकारी निमा अरोरा यांनी कार्यक्रमाकडे पाठ फिरवल्या मुळे आणि उपोषणाच्यां दनक्याने लोकार्पनाचा फज्ज़ा उडाल्याची तालुक्यात खमंग चर्चा आहे
त्याचे झाले असे कि, आसेगाव बाजार येथे शाळेकरीता नवीन ईमारत बांधण्यात आली. शाळेचे निर्माण सुरू असतानाच आसेगाव बाजारचे सरपंच निलेश नारे आणि त्यांचे सहकारी उपसरपंच राहुल धांडे, ग्रामपंचायत सदस्य सुगत धांडे, ग्रामपंचायत सदस्यपती उमेश धांडे आणि ग्रामस्थ दिनेश ग . धांडे व रोहित धांडे यांनी बांधकामा संदर्भात आक्षेप घेतला होता. त्याकरिता त्यांनी मुख्य कार्यपालन अधिकारी जि. प. अकोला यांच्याकडे लिखित तक्रारी केल्या होत्या. बांधकामात निकृष्ट साहित्य वापरण्यात येत असल्याची त्यांची तक्रार होती. या कामावर देखरेख करण्याची जबाबदारी असलेले अभियंता भास्कर यांनीही या साहित्याची पडताळणी केली नसल्याचीही सरपंचांची तक्रार होती. मात्र त्या संदर्भात संबंधित यंत्रणांनी कोणतीच दखल घेतली नाही. ही दाखल न घेणे बाबत जि. प. सदस्य गजानन पुंडकर यांनी संबंधित अधिकाऱ्यांवर दबाव आणल्याचा सरपंच निलेश नारे यांचा आरोप आहे त्यामुळे सरपंचाच्या तक्रारीची चौकशी न होताच शाळेच्या नवीन ईमारतीचे काम पूर्ण करण्यात आले.
अशातच जि. प. सदस्य गजानन पुंडकर यांनी पुढाकार घेऊन दिनांक ९.५.२०२३ रोजी या नूतन शाळा ईमारतीचा लोकार्पण सोहळा आयोजित केला हा लोकार्पण सोहळा अकोला जिल्हाधिकारी निमा अरोरा यांचे हस्ते तर जि. प. मुख्य कार्यपालन अधिकारी सौरभ कटियार यांच्या प्रमुख उपस्थितित या सोहळ्याचे तडकाफडकी आयोजन करण्यात आले होते एकाच दिवसात निमंत्रण पत्रिका छापून त्यांचे गांव भर वितरणही करण्यात आले होते मात्र पालक वर्ग आणि ग्रामस्थांच्यां रोषामुळे जिल्हापरिषद सदस्य पुंडकर यांना पंधरा विस् लोकांच्या उपस्थितित कार्यक्रम उरकावा लागला
त्यावर सरपंच निलेश नारे यांनी जोरदार उठाव करीत उपोषणाचे हत्यार उपसले शाळेचे बांधकाम अतिशय निकृष्ट झाल्याने शाळेत येणाऱ्या ९९ बालकांचे जीवितास या इमारतीपासून धोका असल्याचे त्यांचे म्हणणे आहे त्याकरिता आधी ईमारतीचे बांधकामाची पडताळणी करावी. ती सुरक्षित असल्याची खातरजमा करावी आणि नंतरच ईमारतीचे लोकार्पण करावे. असा पवित्रा सरपंच आणि त्यांचे समर्थक यांनी घेतला तशा आशयाची निवेदनेही त्यांनी जिल्हाधिकारी, जि. प. मुख्य कार्यपालन अधिकारी तथा गटविकास अधिकारी आकोट यांना पाठविली होती.
उपोषणाच्या पवित्र्याची वार्ता समजताच विविध राजकीय पक्षाच्या पदाधिकाऱ्यांनी भेटी दिल्या शिवसेनेचे मा आमदार संजय गावंडे यांनी उपोषण मंडपात अभियंता भास्कर यांची चांगलीच कानउघाड़नी करत या प्रकरणाची संपुर्ण चौकशी होई पर्यन्त सदर कामाचे देयक थांबविण्याचे आदेश दिले त्यावर होकार देऊन तशा स्वरूपाचे पत्र अभियंता भास्कर यांनी दिले
दिवसभर चाललेले उपोषण अखेर पंचायत समिति चे गटनेता धीरज सिरसाठ, अभियंता भास्कर , अभियंता पुनसे , यांच्या लेखी आश्वासना नंतर उपोषण मागे घेण्यात आले यावेळी बहुजन युवा आघाडीचे तालुकाध्यक्ष मयूर सपकाळ ,रुग्णकल्याण समिति सदस्य दिनेश सरकटे ,संदीप आग्रे हरिहर पळसकर , सुगत वानखड़े ,यांच्यासह शेकडो गावकारी उपस्थित होते
सदर प्रकरणात ठेकेदार , अभियंता आणि जिल्हापरिषद सदस्य यांच्या अर्थपूर्ण सेटिंग चा कयास अनेक जानकारांनी लावला असून संपूर्ण तालुकाभर हाच एक विषय चर्चिला जात आहे…