अकोट ग्रामीण पोलिसांची कार्यवाही बॅटरी चोरीचा गुन्हा 12 तासात उघडकीस :-संपूर्ण जिल्ह्यातून अकोट ग्रामीण पोलिसांचे कौतुक..
RaviRaj 11 June 2023
अकोट: काल दिनांक 10/06/2023 रोजी पोलीस स्टेशन अकोट ग्रामीण येथे फिर्यादी नामे अनिल श्रीराम भांडे, वय 51 वर्ष, राहणार अकोलखेड यांनी पो.स्टे.येथे जबानी रिपोर्ट दिला की त्यांची दहीखेड फुटकर गुलरघाट शिवारात निंबाच्या झाडाखाली उभी असलेली जेसीबी मधील रॉयल कंपनीची बॅटरी किंमत 18,000/- रु. व व्हेंट कंपनीचा ग्रीसचा डब्बा किंमत 400/- रु. असा 18,400/- रु. चा मुद्देमाल कोणीतरी अज्ञात चोरट्याने चोरून नेला आहे अशा जबानी रिपोर्ट वरून पोलीस स्टेशन अकोट ग्रामीणला दिनांक 10/06/2023 रोजी अपराध क्रमांक 217/2023 कलम 379 भादवीचा गुन्हा दाखल करण्यात आला.
सदर गुन्ह्याचा तपास पो हे कॉ विलास मिसाळ, ब न. 1137 ह्यांचेकडे देण्यात आला होता. विलास मिसाळ यांनी मा. गोकुळ राज, उप विभागीय पोलीस अधिकारी अकोट व नितीन देशमुख, पोलीस निरीक्षक अकोट ग्रामीण ह्यांचे मार्गदर्शनात तपासाची चक्रे फिरवून पो स्टे अकोट ग्रामीणचे अंमलदार उमेशचंद्र सोळंके, ब न 03, पो कॉ वामन मिसाळ, ब.नं. 1415 ,पो. कॉ. गोपाल जाधव, ब. न. 841 ह्यांचे मदतीने यांनी सदर गुन्ह्यातील आरोपी यांचा कसून शोध घेतला व सदर गुन्ह्यातील बॅटरी व ग्रीसचा डब्बा चोरून नेणारे आरोपी 1) आकाश ऊर्फ अक्षय सुभाष भोयर वय 26 वर्ष, 2) ज्ञानेश्वर मधुकर बागडे, वय 25 वर्ष, दोन्ही रा. दहिखेड फुटकर गुल्लरघाट व चोरीची बॅटरी विकत घेणारा आरोपी 3) सचिन रामदास डोंगरे, वय 25 वर्ष, रा. चोहोट्टा बाजार, ह्यांना ताब्यात घेऊन त्यांचेकडून रॉयल कंपनीची बॅटरी की 18000/- रु.तसेच व्हेंट कंपनीचा ग्रीसचा चा डब्बा किंमत 400 रुपये व गुन्ह्यात वापरलेली एक बोलेरो पिकअप किंमत अंदाजे 4 लाख रुपये असा एकूण 4,08,400/- रु. चा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. सदर गुन्ह्याचा तपास करून 12 तासाच्या आत गुन्ह्यातील आरोपींना अटक करून चोरीस गेलेला मुद्देमाल जप्त करण्यात आला असून या कारवाईचे व अकोट ग्रामीण पोलिसांचे सर्वत्र जिल्हाभरातून कौतुक होत आहे.