कत्तलीसाठी अवैध गोवंश घेऊन जाणारे इसमांवर अकोट ग्रामीण पोलिसांची कार्यवाही:-अकोट पोलिसांच्या बेधडक कारवायांमुळे जनतेमध्ये नवचैतन्य..
RaviRaj 12 June 2023
अकोट : पोलीस स्टेशन अकोट ग्रामीणचे पोलीस उप निरीक्षक विजय पंचबुधे व स्टाफ हे दररोज नेहमीप्रमाणे दिनांक 11/06/2023 रोजी पेट्रोलिंग करीत असतांना त्यांना गोपनीय माहिती मिळाली की, हिवरखेड् ते अकोट रोडने टाटा येस गाडी क्र MH 48 G 2664 ह्या वाहनामध्ये कोंबून कत्तलिकरिता काही गोवंश जातीचे जनावरे घेऊन येत आहेत. त्यावरून विजय पंचबुधे यांनी तात्काळ हिवरखेड रोड वरील फिझा हॉटेलचे जवळ नाकाबंदी करून कत्तलिसाठी अवैध गोवंश घेऊन जाणारे वाहन टाटा एस गाडी क्र. MH 48 G 2664 हे वाहन किंमत 2,50,000 रु. व सदर वाहनात कत्तलिसाठी निर्दयतेने डांबून ठेवलेले 3 गोवंश गोऱ्हे किंमत 44,000 रु. असा 2,94,000 रु चा मुद्देमाल जप्त करून सदर गोवंश कतलीसाठी नेणारे आरोपी 1) अब्दुल वसीम अब्दुल राजिक, वय 29 वर्ष, व 2) मोहम्मद शारिक मोहम्मद आरिफ, वय 33 वर्ष, दोन्ही रा. हिवरखेड, ता तेल्हारा ह्यांना ताब्यात घेण्यात आले आहे.
सदर कार्यवाही मा. गोकुल राज, उप विभागीय पोलीस अधिकारी अकोट, नितीन देशमुख, पोलीस निरीक्षक अकोट ग्रामीण ह्यांचे मार्गदर्शनाखाली पोलीस उप निरीक्षक विजय पंचबुधे, नापोकॉ योगेश जउलकर, ब न 1611, पो कॉ नंदकिशोर नेमाडे, ब न 2024 ह्यांनी केली. मागील काही दिवसांपासून अकोट ग्रामीण पोलिसांच्या या बेधडक कारवायांमुळे तालुक्यातील सर्व जनतेमध्ये नवचैतन्य निर्माण झाले आहे..