INDIA NEWS

Press

अकोट: मुन्ना उर्फ शशिकांत अग्रवाल याच्याकडून अनेकांची आर्थिक फसवणूक..

Salim Khan 15 July 2023

अकोट : शहरातील गव्हर्मेंट कॉन्ट्रॅक्टर असलेला मुन्ना उर्फ शशिकांत अग्रवाल यांने रोडचे कॉन्ट्रॅक्ट मिळत नसल्यामुळे मागील दहा वर्षापासून बांधकाम व्यवसाय मध्ये पदार्पण केले परंतु मुन्ना अग्रवाल हा सुरवात पासूनच उर्मट स्वभावाचा असल्यामुळे रोडच्या कॉन्ट्रॅक्ट मध्ये अयशस्वी ठरलेला कॉन्ट्रॅक्टर आहे त्यामुळे बांधकाम व्यवसायामध्ये त्याने अकोट शहरांमध्ये फ्लॅट सिस्टीम, कमर्शियल अपार्टमेंट यासारखे अनेक बांधकामे केली परंतु यामध्ये सुद्धा मुन्ना अग्रवाल हा पूर्णपणे यशस्वी होऊ शकला नाही नगरपालिकेच्या काही भ्रष्ट अधिकाऱ्यांना हाताशी घेऊन बांधकाम परवानगी तसेच इतर कागदपत्रे मिळवून बांधकामे तर केली परंतु बांधकाम झाल्यानंतर पूर्णत्वाचे सर्टिफिकेट (अहवाल) नगरपरिषद ला देणे गरजेचे आहे त्या अनुषंगाने संबंधित बांधकाम हे पूर्ण झाले असे ग्राह्य धरले जाते व त्यानुसार नगरपालिके कडून भोगवटा प्रमाणपत्र दिले जातात

परंतु मुन्ना अग्रवाल यांने एकाही बांधकामाचे पूर्णत्वाचे अहवाल हा नगरपरिषद ला दिला नसल्यामुळे फ्लॅट धारकांना कम्प्लिशन व भोगवटा प्रमाणपत्र मिळत नसल्यामुळे बँकेचे कर्ज सुद्धा मिळत नाही त्यामुळे अनेक फ्लॅट धारकांना मानसिक त्रास होत असून आर्थिक लुबाडणूक सुद्धा मुन्ना अग्रवाल यांने केली आहे तसेच काही बांधकामा बाबत लिफ्ट सुरू असल्याचे भासवून फ्लॅट विक्री केले आहेत तर काही बांधकामाचे टेरेस पावसाळ्यामध्ये संपूर्ण गळत आहेत खरेदीप्रमाणे कोणत्याही सुविधा उपलब्ध केलेल्या नाहीत व जवळपास सर्वच बांधकामे अपूर्ण ठेवलेली आहेत त्यामुळे अनेक फ्लॅट धारकांचे कुटुंब या फसवणुकीचे बळी ठरले असून आपापसात वाद-विवाद होण्याचे कारण म्हणजेच एकमेव मुन्ना अग्रवाल हा ठरलेला आहे म्हणून फ्लॅट धारकांमध्ये कॉन्ट्रॅक्टर अग्रवाल विरुद्ध संताप व्यक्त होत असून लवकरच त्याच्या विरुद्ध संबंधित तक्रारी केल्या जाणार आहेत अशा या घातक कॉन्ट्रॅक्टरला तात्काळ काळ्या यादीत समाविष्ट करण्याची मागणी फ्लॅट धारकांकडून जिल्हाधिकारी यांच्याकडे करणार आहेत..

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

en_USEnglish