जळगाव जामोद पोलिसांना पूरग्रस्तांना बाहेर काढण्यात यश! पोलीस निरीक्षक दिनेश झांबरे सह सर्व टीमचे सर्वत्र कौतुक…
parmeshwar hatole 24 July 2023
जळगाव जामोद : दिनांक 22 जुलै 2023 रोजी निसर्गाच्या रुद्र अशा ढगफुटी सदृश्य कमी वेळात जास्त पाऊस झाल्याने जळगाव जामोद येथील सातपुडा पर्वतरांगांमधून अतिशय प्रवाहाने नदी नाले भरून आले.. त्यामुळे जळगाव जामोद शहरामध्ये सर्वत्र गुडघाभर पाणी घुसले हा पावसाचा प्रवाह अचानक शहरांमध्ये घुसल्यामुळे सर्व लोकांची आपला जीव वाचवण्याकरिता तारांबळ उडाली..
ही माहिती मिळताच जळगाव जामोद चे पोलीस निरीक्षक दिनेश झांबरे यांनी तात्काळ आपल्या पोलीस कर्मचाऱ्यांसह ताफ्यासह शहरातील प्रत्येक ठिकाणी जाऊन होईल तशा प्रकारे मदत कार्य सुरू केले त्याच दरम्यान शहरातील दोन वृद्ध व्यक्ती पाण्याच्या प्रवाहामुळे वाहून जात असताना जीवाची पर्वा न करता ठाणेदार झांबरे यांनी त्यांचे प्राण वाचवले.. तसेच सर्व लोकांना आवाहन करत त्यांनी शहरातील लोकांना व्यवस्थित अशा ठिकाणी नेण्याची व्यवस्था केली एवढ्यावरच न थांबता कर्तव्याच्या पलीकडे जाऊन पोलीस कर्मचाऱ्यांकडून 250 जेवणाच्या डब्यांची वाटप सुद्धा पूरग्रस्तांना करण्यात आले ..
अशा बिकट प्रसंगातून माणुसकीचा व भावनिक आधार देणारे प्रबळ इच्छाशक्ती असलेले दिनेश झांबरे यांच्या खाकीतील असलेले माणुसकीचे दर्शन जळगाव वासियांना घडले तर कर्तव्यदक्ष व तेवढेच माणुसकी जपणारे दिनेश झांबरे यांचे संपूर्ण जिल्हाभरातून सर्वस्तरांवर कौतुक होत असून भविष्यात या कठीण प्रसंगासोबतच दिनेश झांबरे हे नाव सुद्धा जळगाववाशी यांच्या कायम लक्षात राहुन अधोरेखित केल्या जाईल..