अकोला: मोर्णा नदीपात्रातील संत गाडगे बाबा आपात्कालीन शोध व बचाव पथकाने काढला मृतदेह…
▶️ सिटी कोतवाली परीसरातील मोठयापुलाखाली मोर्णानदित मृतदेह काढण्याची वेळ 2:30 वाजताच्या दरम्यान यवतमाळ जिल्ह्यातील दिग्रस येथील शे.आसीफ शे.हुसेन मृतदेह प्राथमिक दर्शनी असल्याचे समजते..
RaviRaj 4 August 2023

आज 4 ऑगस्ट रोजी दुपारी जुनेशहर पोलिस ठाण्याचे नितीन लेव्हरकर साहेब यांनी पिंजर येथील मानव सेवा आपत्ती व्यवस्थापन फाऊंडेशनच्या संत गाडगे बाबा आपात्कालीन शोध व बचाव पथकाचे प्रमुख दिपक सदाफळे यांना माहीती देऊन तात्काळ मृतदेह काढण्यासाठी पाचारण केले तेव्हा लगेचच पथकाचे प्रमुख दिपक सदाफळे आणी अंकुश सदाफळे,प्रतिक गाडगे, हे घटनास्थळी दाखल झाले आणी अंकुश दिपक सदाफळे या जलपटु स्विमरने नदीपात्रातील मृतदेह बाहेर काढला तेव्हा सुरक्षित स्थळी आण्यासाठी अग्निशामक विभाग मनपा अकोला टीमचे वाहन चालक श्रीकृष्ण गाडगे, फायरमन राहुल वाकोडे,विजय, सोनोने,भुषण ठोसर,यांनी सहकार्य केले.
यावेळी जुनेशहर पोलिस ठाण्याचे पिआय.नितीन लेव्हरकर साहेब,एपीआय.रविंद्र लांडे साहेब,सीटी कोतवाली पोलीस ठाण्याचे पिआय. वायदांडे साहेब आणी जुनेशहर व सीटी कोतवाली पोलिस ठाण्याचे पो.कर्मचारी उपस्थित होते.मृतकाच्या खिशात मिळालेल्या आधारकार्ड वरुन ते शे.आसीफ शे.हुसेन रा. गवळीपुरा अकोला वय अंदाजे 35-38 वर्ष असल्याचे दीसुन आले अशी माहिती पथकाचे प्रमुख दिपक सदाफळे यांनी दीली आहे…