अकोट अकोला एसटी बस मधून प्रवाशांचा जीवघेणा प्रवास-बस मध्ये पावसाचे पाणी साचल्याने पाय घसरून पडण्याची शक्यता..एसटी प्रवाशांमध्ये दहशत..
RaviRaj 5 Sept 2023
Akot : मागील अनेक वर्षापासून महाराष्ट्र शासन व जिल्हा प्रशासन यांच्याकडून अकोट वासियांकरिता विकासाच्या बाबतीत सतत दुजाभाव राहिलेला आहे त्यामध्ये गेली दहा वर्षापासून अकोट अकोला रस्ता जाणून बुजून प्रलंबित ठेवण्यात आलेला आहे तसेच गांधीग्राम येथील पुल बांधण्याकरिता वाहतुकीची सुविधा याकडे प्राधान्य न देता येणाऱ्या निवडणुकीच्या तोंडावर या पुलांचा राजकारणाकरिता वापर करण्याचा उद्देश लोकप्रतिनिधींचा दिसतो आहे परंतु एवढ्यावरच हे निर्दयी प्रशासन व लोकप्रतिनिधी न थांबता एसटीला सुद्धा आपल्या सोबत सामील करीत एसटीचा सुद्धा भोंगळ कारभार करण्यास कोणतीही कसर सोडली नाही याचे ताजे उदाहरण म्हणजे आज संध्याकाळी सात वाजता अकोट वरून अकोला करिता निघालेली mh-40 n 9931 क्रमांकाची अकोट आगारातील बस ही थोड्याशा पावसामध्ये गळती लागून संपूर्ण बसच्या आतील भागामध्ये पाणी साचलेले पाहायला मिळाले व सर्व प्रवासी पावसामध्ये अक्षरशः भिजत असल्याचे निदर्शनास आले यावरून अल्पशा पावसाने अकोट अकोला एसटी बसेसचा भोंगळ कारभार चव्हाट्यावर आला.. त्यामध्ये एसटी प्रवाशांचे प्रचंड हाल झाले आहेत बस मध्ये चढताना व उतरताना घसरून जीवित हानी होण्याची भीती व जीव वाचवण्याकरिता संघर्ष प्रवाशांमध्ये सतत 50 किलोमीटरचा प्रवास संपेपर्यंत सुरू होता असा अनेक प्रकारचा संघर्ष रोजच्या दैनंदिन जीवनात करावा लागतो याची सवय सुद्धा आता अकोट तालुक्यातील लोकांना झालेली आहे याची हमीच जणू निष्क्रिय लोकप्रतिनिधींना झालेली असल्याने कोणतीही उपायोजना न करता एसटी प्रवासात जीवित हानी झाल्यास फक्त पाच लाख रुपये जाहीर करून जबाबदारीतून मोकळे होण्याची परंपरा च या निमित्ताने सुरू झाली की काय असे अनेक प्रश्न निर्माण होत आहेत..
एसटी बस नफ्यामध्ये कशी येईल याचाच विचार फक्त शासनाकडून होत आहे परंतु त्यासोबतच लोकांना किती जीवघेणा प्रवास करावा लागतो व त्यावरील उपाय योजना करण्याचे भान व नियोजन हे कुणाकडेच असल्याचे दिसत नाही संपूर्ण राज्यात अशा प्रकारच्या असुविधा असलेला एकमेव तालुका म्हणजे अकोट हा आहे.. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी व माजी मुख्यमंत्री व विद्यमान उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे दोन विकासपुरुष विदर्भातील असून सुद्धा अकोट अकोला हा 50 किलोमीटरचा रस्ता तयार होण्याकरिता दहा वर्षाचा कालावधी लागतो.. हे दुर्दैव म्हणावे की जनतेमधील असलेली असिमित सहनशक्ती हा एक संशोधनाचा विषय ठरलेला आहे.. तरी तूर्तास एसटी महामंडळाने हा जीवघेणा खेळ कोणत्याही राजकारणाला बळी न पडता तात्काळ थांबवावा अशी भावना जनसामान्यातून येत आहे..