आसेगाव बाजार :येथील सेवा सहकारी सोसायटीमध्ये स्व. तुळशीराम पाचडे यांच्या प्रतिमेचे अनावरण.. सामाजिक हित जोपासणारे आदर्श व्यक्तिमत्व-गजेंद्र पाचडे
RaviRaj 12 Sept 2023
स्थानिक आसेगाव बाजार येथील मा.सरपंच स्व.तुळशीराम मल्लूजी पाचडे यांच्या प्रतिमेचे अनावरण विविध कार्यकारी सहकारी संस्था आसेगाव बाजार येथे नुकतेच संपन्न झाले..
लोकनेते स्व.तुळशीराम मल्लूजी पाचडे यांनी आपल्या कार्यकाळात अनेक समाज उपयोगी लोकहिताची कामे केली.त्यांनी गावकऱ्यांना व शेतकऱ्यांना कर्ज सुविधा उपलब्ध व्हावी याकरिता सेवा सहकारी सोसायटी ला इमारत बांधकाम करण्याकरिता सन.1963 मध्ये स्वतःची जागा दान दिली.त्यांच्या कार्यकाळात गावात विद्युत् पोल आले असून अनेक लोकहिताची कार्य त्यांनी पार पाडले.
त्यांच्या कार्याची दखल घेत आज सेवा सहकारी संस्था कार्यालय येथे संस्थेचे युवा संचालक गजेंद्र दादा पाचडे यांच्या संकल्पनेतून स्वर्गीय तुळशीरामजी पाचडे यांच्या प्रतिमेचे अनावरण नुकतेच पार पडले.
या कार्यक्रमाच्या अध्यक्ष स्थानी श्री.संजयभाऊ पुंडकर हे होते.तर प्रमुख उपस्थिती म्हणून श्री.प्रशांत भाऊ पाचडे सभापती कृषी उत्पन्न बाजार समिती,अकोट सेवा सहकारी संस्था चे उपाध्यक्ष श्री.नंदकिशोर भांबूरकर,जेष्ठ मार्गदर्शक श्री.दिनकरराव उगले,संस्थेचे सदस्य श्री.गजेंद्र दादा पाचडे,श्री.उमेशभाऊ सपकाळ,नावेद पटेल,डाॅ.अजयराव पाचडे, राजूभाऊ बेलोकर,पप्पूभाऊ पाचडे,नरेंद्रभाऊ पाचडे,देवेंद्रभाऊ पाचडे,चेतनदादा उन्हाळे,विलासभाऊ वालखडे,अजाबराव दराळे,संजय झापर्डे,मोहनराव भारसाकळे,किशोर मोरे,सचिनभाऊ पोटदुखे,संथ्येचे सचिव रितेश चौधरी यांची उपस्थिती लाभली..
याप्रसंगी त्यांच्या जीवन कार्यावर श्री.संजयभाऊ पुंडकर,श्री.दिनकर राव उगले,प्रशांतभाऊ पाचडे, नंदकिशोर भांबूरकर,यांनी विचार व्यक्त केले तसेच कार्यक्रमाचे प्रस्ताविक व आभार गजेंद्रदादा पाचडे यांनी मानले..