Akot: विद्यांचल द स्कूलमध्ये शिक्षक दिन मोठ्या उत्साहात साजरा- सर्व विद्यार्थ्यांमध्ये आनंदाचे वातावरण..
RaviRaj 6 Sept 2023
Akot: दरवर्षीप्रमाणे यंदाही विद्यांचल द स्कूल अकोट येथे शिक्षक दिन (गुरुत्व) मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. ४ सप्टेंबर २०२३ रोजी विद्यार्थ्यांनी शिक्षकांबद्दल आदर व्यक्त केला. याच दिवशी विद्यार्थ्यांसाठी स्वयंशासन दिनाचे आयोजन करण्यात आले होते, त्यात सहभागी विद्यार्थ्यांचा उत्साह पाहण्यासारखा होता.
कार्यक्रमाची सुरुवात शाळेच्या संचालिका सारिका भुतडा यांच्या प्रास्ताविकाने झाली, यामध्ये शिक्षकांचे महत्व, त्यांची भूमिका व उद्देश विशद करण्यात आला. शिक्षकांप्रती आदर व्यक्त करण्यासाठी विद्यार्थ्यांनी दुपारी १२ ते ३ वाजेपर्यंत शाळेत संगीत, नृत्य, गाणी, प्रश्नमंजुषा इत्यादी विविध सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन केले होते.विद्यार्थ्यांचा आपल्या शिक्षकांबद्दलचा आदर पाहून सर्व शिक्षकांना आपण शिक्षक असल्याचा अभिमान वाटत होता. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी शिक्षक सहकार्यांचे अभूतपूर्व मार्गदर्शनही लाभले, यामध्ये विनायक दाते, पूजा रघुवंशी व आशिष पांडागळे यांनी नृत्यात मोलाची भूमिका बजावली तर संगीत मध्ये श्रद्धा वानखडे व धिरज अढाऊ आदींनी मोलाची भूमिका बजावली. शिक्षकांच्या कार्याचा गौरव करण्यासाठी ५ सप्टेंबर २०२३ रोजी शाळा व्यवस्थापनाने एवढ्या मोठ्या प्रमाणावर शाळेत आयोजित केलेला कार्यक्रम पाहणे दुर्मिळ आहे. शिक्षक दिनानिमित्त शाळा व्यवस्थापनातर्फे दिवसभर शाळेत शिक्षकांसाठी विविध सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते, ज्यामध्ये संगीत, नृत्य आणि गीत गायन, खेळ आयोजित करण्यात आले होतेसकाळी ८ ते सायंकाळी ५ वाजेपर्यंत स्मृतिचिन्ह भेट म्हणून देण्यात आले. हा कार्यक्रम सुरू होता. संचालक दिनेश भुतडा, सारिका भुतडा, प्राचार्या डॉ. शैलजा त्रिवेदी व प्रशासकीय प्रमुख प्रशांत विनायक यांनी या दिवसाच्या कार्यक्रमाची जबाबदारी पार पाडली.
शाळेला अशा आदरणीय व्यक्तीची उपस्थिती होती, ज्यांच्या आशिर्वाद आणि शुभेच्छांमुळे ही शाळा दरवर्षी आपली छाप सोडत आहे, त्या म्हणजे आदरणीय श्रीमती पुष्पादेवी लक्ष्मीनारायणजी भुतडा, ज्यांच्या हस्ते बक्षिसे व भेटवस्तू देण्यात आल्या..
कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी शाळेच्या प्रशासकीय कर्मचाऱ्यांनी अथक परिश्रम घेतले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन चेतन लोणकर व वैभव राऊत यांनी केले तर प्रास्ताविक पागृत व विवेक वाकडे यांनी पार पाडली. शाळेच्या मुख्याध्यापिका डॉ. शैलजा त्रिवेदी यांनी शिक्षकांबद्दलचा आदर, त्यांची भूमिका सांगून अतिशय उत्साहपूर्ण मार्गदर्शन केले, त्यामुळे कार्यक्रमात एक वेगळेच चैतन्य निर्माण झाले शाळेच्या प्रशासकीय टीमने शिक्षकांना समर्पित नृत्य आणि उत्कृष्ट गीत सादर केले, ज्यामुळे सर्व शिक्षक भारावून गेले. दिवसभराच्या कार्यक्रमात अतिशय महत्त्वाचा आणि शिक्षकांनी वर्षभर केलेल्या मेहनतीमुळे व परिश्रमासाठीचा बक्षीस वितरण समारंभ संपन्न झाला असून आपला पाल्य हा योग्य शाळेत असल्याचा व सक्षम शिक्षकांच्या अखत्यारीत शिक्षण घेत आहे याचे समाधान संपूर्ण पालक वर्गातून व्यक्त होत आहे..