माजी मंत्री रणजीत पाटील यांची क्रेझ कायम..अनेक संघटनांचे निवेदन सत्र पाटील यांना सुरूच..आ.धिरज लिंगाडे यांचे अकोल्यामध्ये अस्तित्व नाही ! ज्ञानदेव मांडवे-जिल्हाध्यक्ष..
ज्ञानदेव मांडवे 25 Nov 2023
Akola : अनेक वर्षापासून प्रलंबित असलेल्या महाराष्ट्र राज्य अशासकीय व्होकेशनल शिक्षकेतर कर्मचारी यांच्या मागण्या आता जोर धरू लागल्या आहेत.. या संबंधित आज महाराष्ट्रातील अशासकीय शिक्षकेतर कर्मचारी यांची वाली असलेली एकमेव संघटना म्हणजेच महाराष्ट्र राज्य अशासकीय व्होकेशनल शिक्षकेतर कर्मचारी महासंघाचे राज्य सचिव व अकोला व वाशिम जिल्ह्याचे अध्यक्ष ज्ञानदेव मांडवे यांच्यासह अनेक पदाधिकारी त्यामध्ये अमित सबनीस, मंगेश सातव, जे बी बर्डे व इतर यांनी माजी मंत्री रणजीत पाटील कौशल्य विकास उद्योजकता विभाग यांना मागण्यांचे निवेदन दिले
…त्यानुसार तात्काळ निवेदनाची दखल घेत विद्यमान कॅबिनेट मंत्री मंगलप्रभातजी लोढा यांना मागण्या संबंधित चर्चा घडवून आणून 24 वर्ष नियमित सेवेनंतर सुधारित आश्वासित प्रगती योजना दहा वीस व तीस वर्षाच्या नियमित सेवेत लागू करण्याचा शासन निर्णय काढण्यात यावा व ज्ञानदेव मांडवे सह सर्व संघटनेच्या पदाधिकाऱ्यांना शिफारस पत्र देऊन मंत्री मंगल प्रभातजी लोढा यांच्यासोबत तात्काळ मीटिंग लावून प्रलंबित असलेल्या मागण्या व इतर विषय मार्गी लावण्याचे आश्वासन देऊन त्यासंबंधीचे पत्र सुद्धा दिले आहे… तसेच 2019 मध्ये मा.रणजीत पाटील कौशल्य विकास उद्योजकता विभागाचे राज्यमंत्री असताना महाराष्ट्र राज्यातील व्होकेशनल कर्मचारी यांना सातवा वेतन आयोग लागू करून एक महत्त्वपूर्ण व वाखण्याजोगा निर्णय घेतला होता.. त्यामुळेच मा.रणजीत पाटील यांची कार्यपद्धती चा पुन्हा एकदा दांडगा अनुभव संघटनेच्या पदाधिकाऱ्यांना आला असून मागील एक वर्षापासून गायब असलेले पदवीधर आमदार धिरज लिंगाडे यांचा संपर्काचा अभाव व रणजीत पाटीलच आम्हाला वाली असल्याचा भावना अनेक पदवीधर कर्मचारी व संघटनेचे पदाधिकारी यांच्याकडून व्यक्त होत आहेत….