hacklink al hack forum organik hit kayseri escort jojobet 1019deneme bonusu verendeneme bonusu veren sitelermarsbahis 463deneme bonusu veren sitelersahabetdeneme bonusu veren sitelerviagra onlinebonus albaşiskele escortbahis1000Mostbetbahis ve casino oyunları1windeneme bonusu veren sitelercasbommatadorbetcasibom giriştipobet güncel girişpusulabetgüvenilir bahis siteleri slot oyunları deneme bonusu veren bahis sitelericashback bahis girişcashback bahis girişonwin

INDIA NEWS

Press

विद्यमान आमदारांची तिकीट कापण्याकरिता अकोट अकोला रस्ता प्रलंबित.. नितीन गडकरी व देवेंद्र फडणवीस यांची खेळी…

RaviRaj 29 January 2024

Akola: 22 जानेवारी ला नरेंद्र मोदी यांनी लवकरच होऊ घातलेल्या लोकसभा निवडणुकी ला लक्ष केंद्रित करून आयोध्या येथे राम प्राणप्रतिष्ठेचा भव्य कार्यक्रम पार पाडला तशाच प्रकारचा एक प्रयत्न आकोट मतदार संघाचे विद्यमान आमदार प्रकाश भारसाकळे यांनी सुद्धा भविष्यातील विधानसभा निवडणुका डोळ्यासमोर ठेवून मागील नऊ वर्षापासून बजरंगबली ला कबूल केलेला कळस चढवण्याचा योग हा काल सातपुड्याच्या पायथ्याशी असलेल्या वारी हनुमान येथे संचित झेंडा रोहन व कळस स्थापनेच्या कार्यक्रमाच्या माध्यमातून मतदार संघातील जनतेशी संवाद साधण्याचा प्रयत्न केला.. या कार्यक्रमाला अकोट मतदार संघाचे आमदार प्रकाश भारसाकळे सह अकोला पूर्वचे आमदार रणधीर सावरकर तसेच मुर्तीजापुर मतदार संघाचे हरीश पिंपळे उपस्थित होते अकोट व तेल्हारा तालुक्यातील सर्व खेड्यापाड्यातील प्रतिष्ठित नागरिकांनी सुद्धा मोठ्या संख्येने हजेरी लावली.. कार्यक्रमाच्या निमित्ताने जमवलेल्या लोकांना तीनही आमदारांनी राजकीय समीकरणे समजावून सांगत येणाऱ्या लोकसभा विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आपण मागील पाच वर्षात खूप मोठा विकास केला असा भास जमलेल्या कार्यकर्त्यांना दाखवीत जणू काही येणाऱ्या निवडणुकीत आपणच जिंकणार अशा आत्मविश्वासाने प्रत्येक आमदाराच्या आजूबाजूने कार्यकर्त्यांची गर्दी जमलेली होती.. सर्वांनी आपापल्या परीने जणू काय जिल्ह्यातील सर्व प्रश्न संपलेले आहेत असा चेहऱ्यावर आनंद दाखवीत.. लोकांचा गोड नमस्कार घेऊन सर्व आमदार मार्गस्थ झाले..

परंतु देशातीलच नव्हे तर जगातील सर्वांत महत्त्वाचा प्रश्न असलेला अकोट अकोला रस्त्याचा असून कुणीही हा रस्ता कधी होणार.. त्या रस्त्याला इतके वर्ष का लागत आहेत.. असा साधा प्रश्न एकाही कार्यकर्त्याने तीनही आमदारांना विचारला नाही.. अकोट अकोला रस्त्याच्या संबंधित तीनही आमदार फक्त बघ्यांची भूमिका घेत आहेत.. या रस्त्यामुळे नऊ वर्षात अनेक अपघात झाले त्यामध्ये अनेकांचे बळी गेले. ॲम्बुलन्स ला अकोला पोहोचण्यासाठी जास्त वेळ लागत असल्यामुळे प्रत्येक पेशंट हा जीवन मरणाशी लढत राहतो.. एस टी महामंडळाचे अतोनात नुकसान होत आहे. मेंटनस मुळे भर रस्त्यात बसेस बंद पडत आहेत टायर चे आयुष्य कमी झाले असून माणसाचे सुद्धा आयुष्य या रस्त्यामुळे कमी झालेले आहे.अशा अनेक समस्यांना मुख्यतः या दोन मतदार संघातील लोकांना मागील नऊ वर्षापासून त्रास होत असल्यावरही आजपर्यंत एकाही आमदाराने पुढाकार घेऊन जनतेच्या अशा अनेक प्रश्नांची उत्तरे न दिल्याने जनतेमध्ये अधिकाधिक याबाबतीत संभ्रम निर्माण होत आहे व हा गोंधळ दूर करण्यासाठी सरकारमधील कोणीच पुढाकार घेत नसल्याचे दिसते.. नॅशनल हायवे अथॅरिटी मधील या रस्त्याबद्दल कोणत्याही अधिकाऱ्यांची बोलायला हिम्मत होत नाही किंवा खरे काय आहे ते सांगायला सुद्धा घाबरतात जणू काही नितीन गडकरी यांच्या दहशतीखाली असल्याचे जाणवते एवढेच नव्हे तर या रस्त्याबद्दल कोणताही लोकप्रतिनिधी बोलत नसल्यामुळे पत्रकारांकडून अधिकाऱ्यांना माहिती विचारली असता कॅमेरासमोर माहिती देण्यास स्पष्ट नकार देतात.. किंवा आमचे वरिष्ठ मुंबईला आहेत दिल्लीला आहेत त्यांच्याकडून माहिती घ्या असे उडवा उडवीचे उत्तरे देतात त्यामुळे सर्व देशात ऐतिहासिक रस्ते तसेच गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड मध्ये नोंद करणारे नितीन गडकरी यांच्या मोठ्या मोठ्या भाषणात काहीही तथ्य नसून खरी परिस्थिती ही वेगळीच असल्याचे चित्र निर्माण झालेले आहे.. नितीन गडकरी यांच्याकडून अकोट अकोला रस्ता खराब असल्यास उखडण्याची घोषणा करून घेतल्या जाते परंतु अंमलात येत नाही.. अकोला जिल्ह्यातील मुर्तीजापुर अकोला हा रस्ता ७२ तासात पूर्ण करून गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड मध्ये नोंद केल्याचा वाजागाजा नितीन गडकरी ने संपूर्ण देशभर केला परंतु त्यांच्याच विदर्भातील त्याच जिल्ह्यातील अकोट अकोला हा 45 किलोमीटरचा रस्ता नितीन गडकरी हे नऊ वर्षापासून अजूनही पूर्ण करू शकले नाहीत.. यामध्ये देशातील लाखो किलोमीटरचे रस्ते पूर्ण केलेत असा दावा करणारे नितीन गडकरी सह महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस,विद्यमान आमदार रणधीर सावरकर व प्रकाश भारसाकळे हे सपशेल अयशस्वी ठरले..

केंद्रात व राज्यात सरकार असूनही फक्त 45 किलोमीटर चा रस्ता हे भाजपा सरकार नऊ वर्षातही दर्जेदार स्वरूपाचा करू शकले नाही याचाच अर्थ या सरकारला फोडाफोडीच्या राजकारणाशिवाय दुसरे कोणतेही विकासात्मक काम करता येत नाही.. किंवा नितीन गडकरी व देवेंद्र फडणवीस अकोट अकोला रस्त्या आडून काहीतरी राजकारण खेळत आहेत का ? रणधीर सावरकर व प्रकाश भारसाकळे यांचे तिकीट कापण्यासाठी तर हा खटाटोप सुरू नाही ना? किंवा ऐन निवडणुकीच्या तोंडावर थातूरमातूर रस्ता करून विद्यमान आमदार श्रेय घेण्यासाठी हा रस्ता प्रलंबित ठेवत आहेत का ? अख्या देशातील रस्ते सुरळीत पूर्णत्वास जात आहेत कधीच कोणताही कॉन्ट्रॅक्टर पळून गेलेला नाही परंतु अकोट अकोला रस्त्यावरचे ठेकेदार हे वारंवार पळून जातात की त्यांना कोणती अदृश्य शक्ती पळवून लावणारी आहे.. पळून गेलेल्या ठेकेदारांकडून शंभर कोटीच्या वर दंड वसूल केला असे सांगितले जाते परंतु प्रत्यक्षात काय खरे व काय खोटे हे कोणालाच ठाऊक नाही जनतेच्या डोळ्यात धुळफेक करण्याकरिता व लोकांना विश्वास यावा याकरिता एवढे मोठे मोठे आकडे हे बोलल्या जातात ..असे अनेक प्रश्न व चर्चा रंगताना दिसत आहेत..त्यामुळे असे कितीही कार्यक्रम केले तरी जनता या भूलथापांना बळी पडणार नसून अकोट अकोला रस्ता हा दर्जेदार व लवकरात लवकर कंम्प्लीट होत नाही तोपर्यंत सर्व लोकप्रतिनिधींना गावबंदी करणे गरजेचे आहे अशा वेदना व भावना जनतेमधून उमटत आहेत…

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

en_USEnglish