अकोला महापालिकेची दादागिरी खपवून घेणार नाही! अतिक्रमण काढल्यास तीव्र आंदोलन करणार – साजिद खान पठाण
RaviRaj 28 February 2024
गरीबो के सन्मान मे काँग्रेस मैदान मे !
अकोला महानगर पालिकेचे माजी विरोधी पक्षनेता साजिद खान पठाण यांच्या नेतृत्वात गांधी रोड स्थिथ अकोला महानगरपलिके समोर जोरदार घोषणा बाजी करून आज तीव्र आंदोलन करण्यात आले ,
अकोला शहरातील फेरीवाले फूटपाथ विक्रेते हे नियमाने पिवळ्या पट्या च्या आतमध्ये व्यवसाय करत असताना नाहक भेदभाव करून अकोला महानगरपालिकेच्या भाजप प्रणित अतिक्रमण विभागाच्या वतीने त्यांच्यावर कारवाई करण्यात येत आहे .
या कारवाई च्या विरोधात काँग्रेस पक्षाच्या वतीने साजिद खान पठाण यांच्या नेतृत्वात तीव्र घोषणाबाजी करून आंदोलन करण्यात आले , यावेळी नगरसेवक मोहंमद इरफान भाई, युवा नेता मोईन खान उर्फ मोंटूभाई , शहर पदाधिकारी कपिल रावदेव जी , ज्येष्ठ नेते अफरोज भाई लोधी , आरोग्य सेल चे जिल्हाध्यक्ष रवी शिंदे जी,
अकोला जिल्हा काँग्रेस कमिटीचे जिल्हा सरचिटणीस व सोशल मीडिया जिल्हाध्यक्ष भुषण ताले पाटील , फिरोज गवली, अब्दुल्ला भाई , सज्जू भाई , वसीम भाई , बंटी भोंडे , फेरीवाले असोशियन चे सलीम भाई व गांधी रोड परिसरातील असंख्य फूटपाथ विक्रेते व कार्यकर्ते उपस्थित होते …