INDIA NEWS

Press

अकोट तालुक्यातील बोर्डीच्या आदर्श शाळेचा व शिक्षकांचा आदर्श घ्यावा..

बोर्डी: “मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा” या अभियानांतर्गत बोर्डीच्या जि.प.आदर्श शाळेने अकोला जिल्ह्यात प्रथम तर अमरावती विभागात तृतीय क्रमांक पटकावला.

RaviRaj 8 March 2024

मुख्यमंत्री माझी शाळा या उपक्रमाअंतर्गत नुकतेच त्रयस्थ समितीद्वारे जिल्हास्तरीय, विभागस्तरीय तथा राज्यस्तरीय मूल्यांकन अत्यंत पारदर्शक व तटस्थपणे पार पडले. आपल्या वैविध्यपूर्ण उपक्रम व गुणवत्तेच्या बाबतीत सुप्रसिद्ध असलेल्या जि.प.व.प्राथ. मराठी आदर्श शाळेची निवड जिल्हास्तरीय प्रथम क्रमांकासाठी तर अमरावती विभागिय मूल्यमापन समितीने पुनश्च सर्वंकष मूल्यांकन करत या शाळेची विभागातून तृतीय क्रमांकासाठी निवड केली.

या दरम्यान समितीमधील सदस्यांनी विद्यार्थ्यांनी स्वतः राबवित असलेल्या उपक्रमांची माहिती जाणून घेत शालेय परसबाग, शाळेतीलपर्यावरणपूरक वृक्ष, शाळेत राबविण्यात आलेले राजस्थानच्या संस्कृतीचे दर्शन घडविणारे विविध नाट्यमय प्रसंग, विद्यार्थ्यांना आर्थिक साक्षरता प्राप्त व्हावी यासाठी स्थापन करण्यात आलेल्या बोर्डी विद्यार्थी बॅकेच्या विद्यार्थी मॅनेजर, कॅशियर, क्लर्क तथा विद्यार्थी व्यवस्थापन मंडळाशी चर्चा केली. कंपोस्ट खत निर्मिती प्रकल्पाची माहिती व प्रात्यक्षिक विद्यार्थ्यांनी करून दाखवले. महाराष्ट्र शासनाचा स्वच्छता दूत प्रकल्पाचे सोशल मिडियावर अपलोड केलेल्या २६७ व्हिडीओंचे सर्व स्तरांच्या मूल्यांकन समितीने निरिक्षण केले. पुस्तकांची शाळा या प्रकल्पात वाचनालयात असलेल्या साडे चार हजार पेक्षा अधिक पुस्तकांची शहानिशा केली.

बोर्डी येथील आदर्श शाळेतील मुख्याध्यापक उमेश चोरेसह शिक्षक रुंद आणि पालक वर्ग..

बाल संसदेच्या (मंत्रिमंडळ) अंतर्गत सर्व प्रकारच्या समित्यांचे कामकाज विद्यार्थी स्वतः करतात हे समितीने जाणून घेतले. एकूण ३० उपक्रमांना गुणदान करित समितीने शाळेला अकोला जिल्ह्यातून पहिले तर अमरावती विभागातून तृतीयक्रमांकाचे बक्षीस जाहीर केल्यानंतर नुकत्याच मुंबई येथील टाटा थिएटर नरीमन पॉईंट येथे पार पडलेल्या राज्यस्तरीय गुणगौरव सोहळ्यात शाळेचे मुख्या. उमेश चोरे सह शा.व्य. समिती शिक्षक वृंदांचा गौरव मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितित तर दिपकजी केसरकर मंत्री शालेय शिक्षण व मराठी भाषा यांच्या शुभहस्ते, सूरज मांढरे शिक्षण आयुक्त महाराष्ट्र राज्य, रणजीत देओल प्रधान सचिव शालेय शिक्षण यांच्या उपस्थितीत करण्यात येऊन प्रमाणपत्र, व ११ लाख रु. चा धनादेश भेट देऊन गौरव करण्यात आला. तसेच बोर्डी वासियांनी मुख्याध्यापक उमेश चोरे व सहकारी शिक्षक वृंद यांनी शाळेला प्रथम क्रमांक मिळवून देण्यासाठी सर्वतोपरी मेहनत घेतल्यामुळे अभिमान व्यक्त केला आहे

मा.मुख्यमंत्री व शिक्षण मंत्री यांच्याकडून अवार्ड स्विकारताना आदर्श शाळेचे मुख्याध्यापक उमेश चोरे सह सर्व शिक्षक वृंद..

तर जिल्ह्यातील इतर शाळा व शिक्षक हे काय करतात हा सुद्धा प्रश्न या माध्यमातून उपस्थित झाला आहे..बोर्डी येथील आदर्श शाळेसारखे वातावरण महाराष्ट्रातील सर्व शाळांमध्ये जर निर्माण झाले तर कोणताही पालक लाखो रुपये खर्च करून इंग्लिश मीडियम खाजगी शाळांकडे वळणार नाही.. त्यामुळे महाराष्ट्र शासनाने बोर्डी येथील आदर्श शाळेसारख्या राज्यातील सर्व शाळा विकसित सुविधा युक्त होतील याकरिता सर्व पातळीवर प्राधान्य दिले पाहिजे..मुलांना आवडणारे वातावरण निर्मिती करण्यासाठी सर्व प्रकारच्या सुविधा शाळांना उपलब्ध करून देण्यासाठी महाराष्ट्र शासनाने सर्वप्रथम पुढाकार घेणे गरजेचे आहे.. अन्यथा पुढील काळात मुलांना शिक्षण देण्यासाठी पोटाला भाकर देणारी शेती विकण्याची वेळ येणार हे निश्चित अन्यथा सामान्य माणूस मुलांना शिक्षण देऊ शकणार नाही अशी भीषण परिस्थिती निर्माण होईल..

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

en_USEnglish