INDIA NEWS

Press

मा.आ.रामाभाऊ कराळे यांच्या स्मृतिदिनी मनिष कराळे यांचा क्रिकेट चषक स्पर्धेचा कौतुकास्पद उपक्रम..

माजी आमदार दिवंगत रामाभाऊ कराळे यांच्या स्मृतिदिनी क्रिकेट स्पर्धेचे आयोजन – अनेक सन्माननीय मंडळी कडून बक्षीस वितरण यशस्वीरीत्या संपन्न..

ही क्रिकेट चषक स्पर्धा ही पुढील पिढीला दिशा देणारी.. मनीष भाऊ कराळे

RaviRaj 13 March 2024

बक्षीस वितरण करताना अकोट शहरातील दिग्गज नेते मंडळी..

Akot : १९ फेब्रुवारी छत्रपती शिवाजी महाराज जयंतीच्या पावन पर्वापासून मनीष कराळे मित्रपरीवार तसेच वाई ग्रामस्थांच्या माध्यमातून स्व.सचिन पाटील कराळे मैदान वाई येथे भव्य खुल्या क्रिकेट स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते.
तीन आठवडे चाललेल्या या क्रिकेट स्पर्धेत अमरावती विभागातील ६४ संघांनी सहभाग घेतला होता या स्पर्धेचा बक्षीस वितरण कार्यक्रम हा १२ मार्च मा.आमदार दिवंगत रामाभाऊ कराळे यांच्या स्मृती दिनी मान्यवरांच्या शुभहस्ते मैदानावर संपन्न झाला.
सदर स्मृतिदिन व बक्षीस वितरण कार्यक्रमाला मा.गणेशराव कराळे (माजी ग्रामसेवक तथा जेष्ठ नागरिक) हे अध्यक्ष म्हणून लाभले होते.त्याचप्रमाणे सदर कार्यक्रमात अकोट विधानसभा मतदारसंघाचे माजी आमदार संजय भाऊ गावंडे,वंचित बहुजन आघाडी मा.जिल्हा उपाध्यक्ष मा.दीपक भाऊ बोडखे,शिवसेना (उ.बा.ठा.)चे उपजिल्हाप्रमुख मा.दिलीप भाऊ बोचे तसेच सोसायटी अध्यक्ष मा.सुरेश कराळे यांची प्रमुख उपस्थिती लाभली होती.
याव्यतिरिक्त सदर कार्यक्रमात जेष्ठ शिवसैनिक मा.त्र्यंबक वैराळे,मा.साहेबराव भगत,मा.ज्ञानेश्वर ढोले,शिवसेना शहर प्रमुख मा.अँड.मनोज खंडारे,युवासेना जिल्हा संघटक मा.विजय ढेपे,मा.बंडूभाऊ बोरोकार,मा.अंबादास कराळे,मा.पिंटू पाटील वडतकार,मा.प्रा.संदीप बोबडे,मा.भास्करराव वानखडे,मा.अँड.मनोज वर्मा,मा.सुनील धुळे,मा.दिनेश वानखडे,मा.प्रा.गजानन भांबुरकर,मा.ज्ञानेश्वर मानकर,मा.विजय मानकर,मा.चंद्रकांत चापके,मा.डॉ.अनिल बाभूळकर,मा.हर्षल मानकर,मा.गोविंद वर्मा,मा.अविनाश उन्होंने,मा.श्रीकृष्णभाऊ सोनोने तसेच विजेत्या संघाचे कर्णधार गोरक्ष ऐवळे इ.मान्यवर प्रामुख्याने मंचावर उपस्थित होते.


सर्वप्रथम मान्यवरांच्या हस्ते छत्रपती शिवाजी महाराज,हिंदुहृदयसम्राट स्व.बाळासाहेब ठाकरे,मा.आमदार दिवंगत रामाभाऊ कराळे यांच्या प्रतिमेचे पूजन तसेच प्रसंगी सार्वजनिक अभिवादन करण्यात आले.
तद्नंतर मा.भास्करराव वानखडे यांनी सदर कार्यक्रमाचे प्रास्ताविक केले.यासह अनुक्रमे उपस्थित मान्यवरांनी मा.आमदार दिवंगत रामाभाऊ कराळे यांच्या स्मृतिदिनी त्यांच्या जीवनकार्यावर प्रकाश टाकत अभिवादनपर मनोगत व्यक्त केले व संपन्न झालेल्या क्रिकेट स्पर्धेचे कौतुक केले.
ग्रामीण भागात अत्यंत भव्य स्तरावर या क्रिकेट स्पर्धेला यशस्वी करण्यासाठी योगदान देणाऱ्या मनीष कराळे मित्रपरिवारातील सर्व सन्माननीय सभासद,पंच,स्कोअरर तसेच कॉमेंटर यांचा मान्यवरांच्या हस्ते यावेळी सत्कार करण्यात आला.

मनीष कराळे यांनी मानले सर्वांचे आभार..


शेवटी सदर स्पर्धेत तृतीय बक्षीस पटकावणारा आझाद 11 संघ अकोट,द्वितीय बक्षीस पटकावणारा ऑरेंज आर्मी संघ अकोलखेड तसेच प्रथम बक्षीस पटकावणारा अकोट C.C.क्रिकेट क्लब अकोट संघाच्या कर्णधारांना अनुक्रमे रोख ११ हजार,३१ हजार,५१ हजार रु.देऊन व विजयी ट्रॉफी तसेच बुके देऊन सन्मानीत करण्यात आले.
याव्यतिरिक्त स्पर्धेत विशेष कामगिरी करणाऱ्या खेळाडूंना वैयक्तिक रोख रक्कम बक्षिसे देऊन सन्मानित करण्यात आले.
कार्यक्रम व स्पर्धा यशस्वीतेसाठी मनीष कराळे मित्रपरिवार तसेच वाई ग्रामस्थ यांनी परिश्रम घेतले.सदर कार्यक्रमाचे सुत्रसंसाचालन विजय बेदरकर तसेच आभार प्रदर्शन मनीष कराळे यांनी केले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

en_USEnglish