कुलकर्णी कुटुंबावर शोककळा..ख्यातनाम आयएएस श्रेणीतील ह.रा. कुलकर्णी यांचे निधन.. कर्तव्यदक्ष व्यक्तिमत्व हरवले आहे – PSI गणेश चोपडे
RavRaj 21 March 2024
आयएएस श्रेणीतील अधिकारी ह.रा. कुलकर्णी
Nanded : जुन्या पिढीतील ख्यातनाम आयएएस श्रेणीतील अधिकारी श्री. ह.रा. कुलकर्णी यांचे दि. २० मार्च रोजी रात्री साडेआठ वाजता निधन झाले कुलकर्णी यांनी नांदेड जिल्हा परिषदेत त्यांनी अधिकारी म्हणून काम पाहिले तर नांदेड नगरपालिकेत त्यांनी तत्कालीन प्रशासक म्हणूनही काही धडाक्याचे निर्णय घेतले..त्यामध्ये वजिराबाद चौकाचे विस्तारीकरण, महंमद अली रोड करिता भूसंपादन हे त्यातील काही निर्णय आज रोजी अधोरेखित आहेत औरंगाबाद येथे अतिरिक्त आयुक्त म्हणून काम केल्यानंतर त्यांना आयएएस श्रेणीत अधिकारी म्हणून विदर्भात अनेक ठिकाणी विविध पदे भूषवली त्यामध्ये अकोला, यवतमाळ येथे कलेक्टर म्हणून त्यांनी कारकीर्द गाजवली अमरावती येथे डिव्हिजनल कमिशनर म्हणून त्यांनी काम पाहिले. प्रचंड बुद्धिमत्ता, कामाप्रती निष्ठा आणि अमाप लोकसंग्रह ही त्यांची वैशिष्ट्ये होती. कुलकर्णी यांच्या अतिशय उत्कृष्ट कार्यशैलीमुळे अकोला अमरावती औरंगाबाद व नांदेड या ठिकाणची जोडलेली व अजूनही कायम प्रेम करणारी सन्माननीय वरिष्ठ मंडळी आज इतक्या वर्षानंतरही कुलकर्णी यांच्या जाण्याने त्यांच्या अंत्ययात्रेत हळहळ व्यक्त करताना दिसत असून अनेकांच्या डोळ्यात अश्रू धारा ओसंडून वाहत होत्या
आयुष्यात माणसे जोडणारे एक चांगले व्यक्तिमत्त्व आज हरवले आहे अशा वेदना ओसंडून वाहत होत्या त्यांच्यावर प्रेम करणारी मंडळी व त्यांच्या पश्चात असलेले कुटुंब पत्नी, मुली, जावई, नातवंडे, बहिणी यांच्यावर फार मोठा दुःखाचा डोंगर कोसळलेला आहे..असे व्यक्तिमत्व पुन्हा होणे नाही अशा संवेदना नांदेड वासियांकडून व्यक्त होत आहेत..