INDIA NEWS

Press

बळीराजा पार्टीचे लोकसभेचे उमेदवार जाहीर..विदर्भातील रामटेक मतदार संघातून गजानन लोखंडे तर पश्चिम विदर्भात चाचपणी सुरू..

पश्चिम विदर्भातील अकोला, वाशिम यवतमाळ, बुलढाणा लोकसभा मतदारसंघातील उमेदवारांची चाचपणी सुरू.. लवकरच येणाऱ्या दोन दिवसात उमेदवार जाहीर करू.. रविराज मोरे.. महासचिव, बळीराजा पार्टी

Salim Khan 29 March 2024

Akola : एकीकडे महाविकास आघाडी चा गोंधळ तर दुसरीकडे महायुतीमध्ये बंडखोरी होण्याची शक्यता अशा प्रकारच्या चर्चा अनेक दिवसापासून सुरू आहेत.. या दोन्हीही आघाडीतील पक्षांना जनता कंटाळलेली असल्यामुळे जनतेसमोर अनेक नवीन पक्षाचे पर्याय उपलब्ध आहेत परंतु त्यामध्ये सुद्धा सर्व समावेशक अशी धोरणे ठेवून सर्वसामान्यांचे प्रश्न जाणून घेणारा पक्ष म्हणजेच बळीराजा पक्ष…हा गेली दहा वर्षापासून जनतेसमोर पर्याय म्हणून उदयास आलेला आहे.. यापूर्वी सुद्धा सर्व देशभरातून अनेक राज्यात बळीराजा पार्टीने लोकसभा व विधानसभा उमेदवार दिले असून जनतेला बळीराजा पक्ष हा पसंतीस उतरलेला आहे.. त्यामुळे बळीराजा पक्ष हाच एकमेव पर्याय आजच्या राजकीय परिस्थितीला अनुसरून जनतेसमोर ठाम उभा आहे..कोणत्याही प्रकारची ईडीची किंवा सीबीआय यासारख्या तपास यंत्रणांची भीती नसलेला सर्वसामान्यांचा हक्काचा पक्ष म्हणजेच बळीराजा पक्ष हा आहे.. कोणत्याही प्रकारची घराणेशाही या पक्षात चालत नसून सर्व जाती धर्म एकत्रित येऊन जनतेचे प्रश्न, समस्या, सक्षमपणे संसदेत आवाज उठवून सोडवण्याकरिता होऊ घातलेल्या लोकसभेमध्ये महाराष्ट्रातील सर्व जागांवर बळीराजा पक्ष उमेदवार देणार आहे.. त्यामध्ये पूर्व विदर्भातील रामटेक मतदार संघामध्ये गजानन लोखंडे यांची उमेदवारी जाहीर झाली आहे तर पश्चिम विदर्भातील अकोला, वाशिम यवतमाळ, बुलढाणा या लोकसभा मतदारसंघाची सुद्धा चाचपणी सुरू आहे बळीराजा पक्ष हा नवीन पिढीला प्राधान्य देऊन संधी देणारा पक्ष आहे.. लवकरच पुढील दोन दिवसांत पक्षाची भूमिका बळीराजाच्या पार्टीचे महासचिव रविराज मोरे हे जाहीर करतील..

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

en_USEnglish