INDIA NEWS

Press

हरमकर प्रकरण गळ्यात.. तरी अकोला पोलीस तोऱ्यात..

RaviRaj 15 May 2024

अकोट : तालुक्यातील सुकळी या गावातील गोवर्धन हरमकर हा तरुण अकोट पोलिसांच्या कस्टडीत मृत्यू पावला होता.. हे मृत्यू प्रकरण अकोट पोलीस दलातील तीन पीएसआय सह अनेक हेड कॉन्स्टेबल व शिपाई यांना चांगलेच भोवले यामध्ये खुद्द अकोट शहर चे पोलीस निरीक्षक तपन कोल्हे यांची तडका फडकी बदली पोलीस मुख्यालय अकोला येथे करण्यात आली.. गोवर्धन हरमकर हा मृत्यू तांडव जवळपास तीन महिने दाबून ठेवला व हा प्रकार पोलीस उपविभागीय अधिकारी अनमोल मित्तल यांच्यापासून लपून राहिला असेल याची शंका आहे कारण एवढे मोठे प्रकरण दाबण्याचे सर्वतोपरी प्रयत्न वरिष्ठांपासून सुद्धा झालेले असावेत याचा छडा लावणे गरजेचे आहे..

एवढे गंभीर प्रकरण घडूनही की ज्या प्रकरणामुळे महाराष्ट्र विधान परिषद मध्ये सुद्धा या प्रकरणाचे पडसाद उमटलेले असून सुद्धा अकोला पोलीस अधिक्षक हे गंभीर असल्याचे दिसत नाहीत फक्त बदल्यांचे खेळ सुरू आहेत लोकसभा निवडणुकी दरम्यान नियमित कारण सांगणारे अकोला पोलीस मनुष्यबळ कमी असतानाही पाच पोलीस कर्मचारी कोणतीही पूर्वसूचना न देता फरार आहेत जर हे पोलीस कर्मचारी निर्दोष आहेत तर ते फरार कशासाठी होते ? त्यांचा आपल्याच वरिष्ठ अधिकाऱ्यांवर व न्यायपालिकेवर विश्वास नाही का ? सामान्य जनतेवर वचक व दहशत निर्माण करण्यासाठीच कायदा या शब्दाचा वापर करणारे पोलिसच कायदा व सुव्यवस्था पायदळी तुडवण्याचे काम करीत आहेत..याचाच अर्थ सामान्य जनतेकरिता वेगळा कायदा व पोलिसांकरिता वेगळा कायदा आहे का ? अशी चर्चा होत आहे..

एवढी मोठी घटना घडल्यावर सुद्धा जवळपास तीन महिने पोलीस स्टेशन मधील प्रत्येक कर्मचाऱ्याला कस्टडी मृत्यू प्रकरणाबद्दल माहिती नव्हती हे नाकारताच येत नाही कारण पोलीस स्टेशनला साधे पोलीस निरीक्षक यांचे अभिनंदन करायला सुद्धा कोणी गेले असल्यास ही गोष्ट संपूर्ण शहरात वाऱ्यासारखी पसरते ही तर घटना मृत्यूची आहे.. सीसीटीव्ही कॅमेरे चालू असल्यावरही कॅमेऱ्याच्या कव्हरेज क्षेत्राच्या बाहेर जाऊन सुद्धा पोलीस मारहाण करतात असे अनेक अनुभवी लोक सांगतात त्यामुळे मागील तपासातील घडामोडी पाहता जवळपास पोलीस स्टेशन मधील सर्वच कर्मचारी व अधिकारी हे प्रकरण दाबण्याकरिता प्रयत्नात होते. त्यासोबतच प्रोत्साहन देणारे वरिष्ठ अधिकारी यांच्यावर फक्त बदल्यांचा खेळ न करता कठोर कारवाई करणे गरजेचे आहे असे कायदेतज्ञांचे मत आहे की ज्यामुळे कायदा हा सर्वांसाठी सारखाच आहे असा एक चांगला संदेश या माध्यमातून जिल्ह्यातीलच नव्हे तर संपूर्ण महाराष्ट्रातील जनतेपर्यंत पोहोचेल..

सावकार ग्रस्त शुभम नारे सह अनेक शेतकरी

या कस्टडी मृत्यू प्रकरणाचा तपास सीआयडी करीत आहे यामध्ये अजून अनेक आश्चर्यकारक खुलासे यापुढे होणार आहेतच.. हा सर्व प्रकार खूप गंभीर असून अकोला पोलीस दलाला काळीमा फासणारा आहे.. तरीसुद्धा या प्रकरणातून कोणताही बोध अकोला पोलीस घेताना दिसत नाही.. कारण अकोला पोलीस त्यांच्या तोऱ्यात अजूनही वावरताना दिसतात.. दोन दिवसांपूर्वी उपविभागीय पोलीस अधिकारी अनमोल मित्तल यांच्याकडे सावकार ग्रस्त शुभम नारे सह अनेक शेतकरी अवैध सावकार रवींद्र कासट विरुद्ध निवेदन देण्याकरिता गेले असता शेतकऱ्यांनी निवेदन देत असताना चे स्वतःच्या भावना व्यक्त करण्यासाठी फोटो काढण्याचा आग्रह केला असता अनमोल मित्तल यांनी फोटो काढणे तर दूरच मोबाईल सुद्धा आत मध्ये घेऊन जाण्याची परवानगी दिली नाही एवढेच नाही तर पाच शेतकऱ्यांपैकी फक्त दोनच शेतकऱ्यांना आत मध्ये येण्याची परवानगी दिली.. हा आश्चर्यकारक प्रकार अनमोल मित्तल यांच्याकडेच नव्हे तर पोलीस अधिक्षक बच्चन सिंग यांच्याकडे सुद्धा सर्रास सुरू आहे..

पोलीस अधिकाऱ्यांच्या सर्व ऍक्टिव्हिटी चे व्हिडिओ रेकॉर्डिंग व फोटो काढणे हा जनसामान्याचा अधिकार..

सार्वजनिक विषयाचे निवेदन देताना फोटो काढण्याला विरोध करणे किंवा मोबाईल बाहेर ठेवणे हा प्रकार समजण्यापलीकडे आहे..आयपीएस अधिकारी यांचे ऑफिस हे वैयक्तिक आहे का? आयपीएस अधिकारी सार्वजनिक सेवक नाहीत का? यांच्या ऑफिसमध्ये सीसीटीव्ही कॅमेरे चालू नाहीत का? आयपीएस दर्जाचे असलेले अधिकारी यांना यांच्या स्वतःच्या केबिन मधील सीसीटीव्ही कॅमेऱ्यांवर विश्वास नाही का? सामान्य जनतेसाठी हे वेगळे नियम लादण्याची काय गरज आहे? असे अनेक प्रश्न उपस्थित झाले आहेत.. कुणाची जीवित हानी होत असेल, कुणाचा परिवार रस्त्यावर येत असेल.. कुणी गुंडांच्या दहशतीखाली जगत असेल अशा अनेक प्रकरणाची दखल न घेता आयपीएस अधिकारी स्वतःच्या कर्तव्याप्रति गंभीर नसून फक्त आणि फक्त सामान्य जनतेवर कोरडा तोरा दाखवण्यातच धन्यता मानतात..

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

en_USEnglish