INDIA NEWS

Press

अकोट तेल्हारा मतदार संघात उभे राहणार तीन ताकदवर स्थानिक उमेदवार..आ.भारसाकळे यांची उडाली झोप ! बोरीया बिस्तरा बांधून ठेवण्याची वेळ..

RaviRaj 9July 2024

अकोट तेल्हारा मतदारसंघात ताकदवर सक्षम स्थानिक व सर्वमान्य असलेले तीनही उमेदवार..

नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकांची रणधुमाळी थंड होत नाही तर लगेचच विधानसभा निवडणुका सुद्धा दोन महिन्यावर येऊन ठेपल्या आहेत अनेक इच्छुक उमेदवार मैदानात उतरण्याची शक्यता आहे.. त्यामध्ये मागील जवळपास वीस वर्षापासून संजय गावंडे यांचा काळ वगळता अकोट तेल्हारा मतदार संघावर सदैव बाहेरच्या उमेदवारांनीच वर्चस्व गाजवले ..जातीपातीच्या राजकारणात निष्क्रिय आमदारांना निवडून देण्याचे काम अकोट मतदार संघातील जनतेच्या हातून घडले आहे..

परंतु यापुढे बाहेरच्या उमेदवारांना अकोट तेल्हारा मतदारसंघात बिलकुल थारा देणार नसल्याची भावना मतदार संघात दिसत आहे त्यामध्ये स्थानिक उमेदवारांमध्ये सक्षम असे उमेदवार या निवडणुकीत दिसणार आहेत.. त्यामुळे विद्यमान आमदार प्रकाश भारसाकळे यांना बोरिया बिस्तरा गुंडाळून वापसी दर्यापूरला जावे लागेल हे निश्चित !

सर्वांना परिचित असलेले शिवाजी शिक्षण सोसायटीचे उपाध्यक्ष अॅड गजानन पुंडकर हे सुद्धा विधानसभेच्या मैदानात ताकदीने उतरणार आहेत

कारण अकोटच नव्हे तर संपूर्ण विदर्भात तसेच पोलीस पाटील संघटनेच्या माध्यमातून पूर्ण राज्यात सर्वांना परिचित असलेले आसेगाव बाजार येथील शिवाजी शिक्षण सोसायटीचे विद्यमान उपाध्यक्ष अॅड गजानन पुंडकर यांच्या माध्यमातून अकोट तेल्हारा मतदार संघाला ताकदवर उमेदवार मिळणार आहे.. त्यामुळे प्रस्थापित नेत्यांना व विद्यमान आमदारांना यावेळेस होणारी निवडणूक ही सोपी नसणार ..येणाऱ्या निवडणुकीमध्ये जनतेमधून खूप मोठ्या प्रमाणात आक्रोश दिसण्याची चिन्हे आहेत सोबतच स्थानिक इच्छुक असलेले उमेदवार सुद्धा आक्रमकपणे आपली भूमिका मांडताना दिसत आहेत..

अकोट तेल्हारा विधानसभेचे सक्षम स्थानिक व सर्वमान्य भाजपाचे उमेदवार राजेश पाचडे हे रिंगणात उतरणार आहेत..

त्यामध्ये आसेगाव बाजार येथीलच भाजपच्या दिग्गज नेत्यांच्या प्रमोद महाजन असो की गोपीनाथ मुंडे किंवा भाऊसाहेब फुंडकर यांच्या तालमीत घडलेले व पक्षाशी एकनिष्ठ असलेले राजेश पाचडे यांची सुद्धा विधानसभा लढण्याची तयारी जोरात सुरू असलेली चर्चा आहे पाचडे यांनी दिल्लीमध्ये वजन असणाऱ्या भाजप नेत्यांच्या संपर्कात फिल्डिंग लावण्याची माहिती दिली आहे त्यामुळे भाजपचे कट्टर व तळगडातील जनतेशी व कार्यकर्त्यांशी थेट नाळ जुळलेले राजेश पाचडे यांच्यामुळे मात्र विद्यमान आमदार प्रकाश भारसाकळे यांची मोठी पंचायत होण्याची शक्यता आहे..

उच्चशिक्षित प्राध्यापक असलेले व अकोट तेल्हारा मतदार संघाचा तगडे अभ्यासक राजेंद्र पुंडकर यांची सुद्धा भाजपाचे तिकीट मिळवण्यासाठी तगडी फील्डिंग असल्याची चर्चा आहे..

तसेच प्रकाश भारसाकळे यांच्यापुढे पुन्हा एक मोठे संकट प्रा. राजेंद्र पुंडकर यांच्या माध्यमातून उभे ठाकले आहे उच्चशिक्षित व गेली अनेक वर्षापासून राजकीय अनुभव लाभलेले आसेगाव बाजार येथीलच अकोलखेड येथे प्राध्यापक म्हणून सेवा देणारे व जनतेच्या समस्या सोडवण्यासाठी सदैव तत्पर असलेले राजेंद्र पुंडकर हे सुद्धा भाजपमधून तिकीट मिळवण्याच्या रेसमध्ये आहेत त्यामुळे लोकसभेच्या निवडणुकीमध्ये भाजपला महाराष्ट्रातच नव्हे तर संपूर्ण देशात खूप मोठा फटका बसला त्यामुळे येणाऱ्या विधानसभा निवडणुकीला समीकरणे बदलण्याची शक्यता दाट आहे त्यामध्ये चेहरा बदलांचा फटका हा विद्यमान आमदार प्रकाश भारसाकळे यांना शंभर टक्के बसण्याची शक्यता आहे.. कदाचित प्रकाश भारसाकळे यांनी भाजपचे तिकीट आणलेच तर यावेळी विधानसभा मतदारसंघात स्थानिक उमेदवारालाच प्राध्यान्य देणार असल्याचे वातावरण आकोट तेल्हारा मतदारसंघात निर्माण झालेले आहे

मागील दहा वर्षापासून पार्सल असलेले विद्यमान आमदार यांना जनता कंटाळलेली असून स्थानिक असलेल्या नवीन चेहऱ्याला संधी देण्याच्या उद्देशाने मतदार हा सज्ज झालेला आहे.. त्यामुळे विद्यमान आमदार प्रकाश भारसाकळे यांनी मोठे मन करून डिपॉझिट जप्त होण्यापेक्षा निवडणुकीतून माघार घ्यावी असे भाजपमधीलच आमदार भारसाकळे यांच्या कार्यपद्धतीमुळे दुरावलेल्या कार्यकर्त्याकडून भावना व्यक्त होताना दिसत आहेत..

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

en_USEnglish