बळेगाव फाट्यावर पिकप वाहनाने दिली दुचाकीला जोरदार धडक ! दुचाकी स्वाराचा जागीच मृत्यू..
sanjay Shelke 14 July 2024
आताच सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार अकोट अकोला रस्त्यावर रात्री दहा वाजता बळेगाव फाट्यावर भरधाव वेगाने आलेली बोलोरो पिकप ने दुचाकी वाहनाला जोरदार धडक दिली त्यामध्ये दुचाकी वाहनधारक हा रौंदळा या गावचा रहिवासी असून त्याचे नाव गोविंद समाधान ढगे वय 40 असल्याची प्राथमिक माहिती आहे..
हा अपघात झाल्याबरोबरच आकोट येतील ॲम्बुलन्स चालक व समाजसेवक संजय शेळके यांनी अपघातातील दुचाकी वाहक गोविंद ढगे यांना तात्काळ अकोट ग्रामीण रुग्णालयात दाखल केले असता ढगे यांचा मृत्यू झाल्याची माहिती शेळके यांना मिळाली.. तसेच भरधाव वेगाने धडक देणारा बोलेरो पिकप हा फरार असल्याचे वृत्त आहे..