आ. प्रकाश भारसाकळे यांना वाढदिवसानिमित्त ना”राजी”नामा चे विशेष गिफ्ट..अचानक जुन्या कार्यकर्त्यांची झाली आठवण ! वाढदिवसाच्या बॅनर करिता मागवले फोटो..
Sanjay Shelke 3 August 2024
“आम्हाला स्थानिकच आमदार हवा”या चळवळीला भव्य दिव्य स्वरूप तयार झाले आहे..याचे पडसाद अगदी दोन दिवसातच तेल्हारा भाजप कार्यकारिणी मध्ये बघायला मिळाले तेल्हारा भाजप कार्यकारणी मधील अनेक वर्षापासून निष्ठेने, प्रामाणिकपणे, भाजपाचे तन-मन-धनाने कार्य करणाऱ्या कार्यकर्त्यांना कोणताही प्रकारचा मान सन्मान मिळत नसल्याचा आरोपच निष्ठावान कार्यकर्ते व पदाधिकाऱ्यांनी केला आहे हीच परिस्थिती आकोट तालुका कार्यकारणीत सुद्धा बघायला मिळाली ..
विद्यमान आमदार प्रकाश भारसाकळे यांच्या गेली दहा वर्षापासून वाढदिवसाच्या बॅनरवर जुन्या कार्यकर्त्यांचे फोटो कधीच झळकले नाहीत परंतु 30 जुलैला “आम्हाला स्थानिकच आमदार हवा”या कार्यक्रमामुळे विद्यमान आमदारांची हवा टाईट झाल्यामुळे तात्काळ वाढदिवसाच्या बॅनर वर जुन्या कार्यकर्त्यांचे फोटो झळकले यावरून या कार्यक्रमाची धास्ती विद्यमान आमदाराने किती मोठ्या प्रमाणात घेतली आहे हे यावरून स्पष्ट होते तसेच या कार्यक्रमाचे आयोजक रविराज मोरे यांच्यावर कार्यक्रमाच्या अगोदरच वेगवेगळ्या प्रकारचा दबाव आल्याची माहिती मोरे यांनी दिली ..
एवढेच नव्हे तर कार्यक्रम हा सहा वाजता सुरू होण्यापूर्वीच विद्यमान आमदार प्रकाश भारसाकळे यांच्या व्हाट्सअप ग्रुप वर पी ए मयूर महाले याने कार्यक्रमाचे व्हिडिओ ,फोटो, बातम्या ग्रुप वर दिसू नयेत म्हणून रविराज मोरे यांचा नंबर चार वाजताच ग्रुपच्या बाहेर काढून ब्लॉक करून सुटकेचा निःश्वास टाकला एवढी दहशत व धास्ती या उपक्रमाची विद्यमान आमदारांनी घेतली आहे.. रविराज मोरे हे कोणत्याही दबावाला बळी पडत नाहीत हे लक्षात आल्यानंतर आमदाराचे पीए मयूर महाले यांनी अकोला येथील सिटी न्यूज चे उपसंपादक राजेश निखाडे यांना सुद्धा हा उपक्रम तात्काळ थांबवण्याची विनंती केली परंतु त्याचाही काही उपयोग झाला नाही त्यामुळे या उपक्रमामुळे व भाजपचे कार्यकर्त्यांमध्ये विद्यमान आमदारांचे वजन कमी होण्याच्या भीतीने मयूर महाले वेगवेगळ्या पद्धतीने हा उपक्रम थांबवण्याचा प्रयत्न करीत असल्याचे निदर्शनास आले या अनुभवातूनच भाजप पदाधिकाऱ्यांनी राजीनामा देण्याचा कठोर निर्णय घेतला असल्याची चर्चा आहे…
तसेच विश्वासात न घेता कार्यकर्त्यांची निष्ठा डावलून दलबदलू लोकांना नियुक्त्या देण्यात येत आहेत “आम्हाला स्थानिकच आमदार हवा “या चळवळीने भाजप पक्षामध्ये गुदमरलेल्या कार्यकर्त्यांमध्ये नवचैतन्य निर्माण झाले..मागील दहा वर्षापासून जुन्या कार्यकर्त्यांना वजनाखाली ठेवण्याचे काम विद्यमान आमदारांने केले आहे परंतु” आमचं अकोट तेल्हारा” या उपक्रमामुळे भाजपच्या कार्यकर्त्यांमध्ये आत्मविश्वास निर्माण झाला असून मागील दहा वर्षाचा मनात असलेला संतप्त ,आक्रोश, राग या राजीनामाच्या माध्यमातून पक्षश्रेष्ठी समोर व्यक्त केला
यामध्ये तेल्हारा येथील स्थानिक पदाधिकारी गजानन उंबरकर, डॉ. बाबुराव शेळके, महेंद्र गोयंका, केशव ताथोड, गजानन नळकांडे, दीपक पोहणे, राजेश टोहरे, जयश्री पुंडकर, गजानन गावत्रे, अनिल पोहणे असा बूथ प्रमुख ,प्रसिद्धीप्रमुख, शहर उपाध्यक्ष ,माजी नगरसेवक, माजी सरचिटणीस, व्यापारी आघाडी, वैद्यकीय आघाडी ,युवा मोर्चा अध्यक्ष, जिल्ह्यातील काही महत्त्वाचे पदाधिकारी व तेल्हारा तालुक्यातील जवळपास सर्वच पदांचा सामूहिक राजीनामा सर्व सहमतीने पक्षश्रेष्ठींकडे पाठवण्यात आला असून सोबतच उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, प्रदेश उपाध्यक्ष संजय कुटे, विदर्भ संघटन मंत्री उपेंद्र कोठेकर अशा सर्व दिग्गज भाजपा नेत्यांना पाठवण्यात आला..
त्यामुळे एकच खळबळ विद्यमान आमदाराच्या वाढदिवशी उडाली भाजपा पक्षश्रेष्ठींनी अकोट तेल्हारा मतदार संघाला आता तरी हलक्यात घेऊ नये. “उपऱ्या “आमदारामुळे मतदार संघातील 2014 पर्यंतचे मजबूत असलेले भाजपा संघटन याला तडा गेला असून या अघोषित हुकूमशाही विरोधात आता सर्व भाजपा पदाधिकारी एकवटल्याचे दिसत आहे..आपलं अकोट तेल्हारा प्रस्तुत “आम्हाला स्थानिक आमदार हवा”या चळवळीने आता खूप मोठ्या स्वरूपात पेट घेतलेला आहे ही चळवळ आता थांबणार नाही..भाजपा कार्यकर्त्याच्या मनातील आक्रोश रुपी आग येणाऱ्या विधानसभेपर्यंत विझणार नाही अशी ग्वाही भाजपा कार्यकर्ते राजेश पाचडे यांनी दिली..