अकोलखेड धारूर रस्त्याकरिता शेतकऱ्यांचा एल्गार..निवडणुकांच्या आधी रस्ता न झाल्यास विद्यमान आमदारावर बहिष्कार..
Raviraj 5 August 2024
मागील अनेक वर्षापासून अकोलखेड ते धारूर शेत रस्त्याची मागणी आहे. हा शेत रस्ता अतिशय महत्त्वाचा मानला जातो कारण या रस्त्याने धारूर येथील गावकरी पायी चालत येतात तसेच अकोलखेड येथील शेतकऱ्यांची सर्व शेती ही या शेत रस्त्यावर आहे शेतीच्या वहिवाटी करिता या सर्व शेतकरी बांधवांना हाच एकमेव शेत रस्ता आहे शेतात रासायनिक खत ट्रॅक्टर वाहन नेण्याकरिता अनेक शेती विषयक अडचणी पावसाळ्यात निर्माण होतात त्यामुळे अनेकांची शेती तर पडीक राहिली आहे तर काही शेतकऱ्यांची शेती वहिवाट न झाल्यामुळे पेरून सुद्धा संपूर्ण पिक वाया गेले आहे सततच्या पावसामुळे या शेत रस्त्याने गुडघ्यापर्यंत पाय चिखलात फसतात त्यामुळे शेतीची वहिवाट करणे मुश्किल होऊन गेले आहे.. त्यामुळे शेतकऱ्यांवर स्वतःची शेती असून सुद्धा रस्त्यामुळे उपासमारीची वेळ आली आहे.. विद्यमान आमदार मागील दहा वर्षापासून या मतदारसंघाचे प्रतिनिधित्व करीत आहेत परंतु शेतकऱ्यांच्या समस्या कडे बघायला विद्यमान आमदाराला बिलकुल वेळ नाही आमदाराच्या पी ए मयूर महाले ला मातोश्री पांदन रस्त्याबद्दल माहिती विचारली असता
अकोलखेड धारूर रस्ता हा 20 लाखात होत नसल्यामुळे त्याची वाढीव मंजुरात 48 लाखापर्यंत करण्यात येणार आहे अशी माहिती मयूर महाले कडून मिळली
आणि वीस लाखाच्या वर पांदन शेत रस्त्यासाठी शासन वाढीव मंजुरात कधीच देत नाही अशी माहिती जि प सदस्य जगन निचळ यांनी इंडिया न्यूज ला दिली आहे .
त्यामुळे खरे काय आहे हे कुणीच सांगायला तयार नाही फक्त आणि फक्त राजकारण सुरू आहे परंतु या राजकारणाच्या खेळात शेतकऱ्यांचा मात्र बळी जातो आहे या बाबतीत संपूर्ण शेतकऱ्यांची दिशाभूल करण्याचा प्रयत्न विद्यमान आमदार व जि प सदस्य जगन निचळ यांच्याकडून केला जातो आहे का ? असे अनेक प्रश्न उपस्थित होत आहेत.. शेतकऱ्याचा वाली कुणीच राहिलेला नाही या भाजप सरकारच्या निष्क्रियतेचा कळस गाठलेल्या आमदाराच्या कार्यप्रणालीमुळे शेतकऱ्यांना आत्महत्या कराव्या लागत आहेत..
शेतकऱ्यांना आत्महत्या करण्यास एक प्रकारे प्रवृत्त करण्याचे कामच भाजप सरकारमधील आमदार करीत आहेत.. त्यामुळे यापुढे या सरकार ची हुकूमशाही सहन करणार नाही ..करिता आठ दिवसात या प्रकरणाची दखल न घेतल्यास अकोलखेड वरून तहसीलदार , एस डी ओ विद्यमान आमदारांना बैलगाड्यासह जन आक्रोश आंदोलन करीत खूप मोठ्या संख्येने घेराव घालण्याचा आक्रमक इशारा अकोलखेड येथील शेतकऱ्यांनी दिला आहे..