INDIA NEWS

Press

आठ महिन्यापासून फरार आरोपी पोलिसांना जेरबंद करण्यास सीआयडी अपयशी..

Ravi Raj 28 August 2024

कस्टडी डेथ मध्ये मृत्यू पावलेला मृतक हरमकर

आकोट शहर पोलीस स्टेशनमध्ये जानेवारी 2024 मध्ये घडलेल्या कस्टडी डेथ प्रकरणातील फरार आरोपी असलेले पाच पोलीस कर्मचारी यांना मागील आठ महिन्यांत अकोट जिल्हा सत्र न्यायालय व मुंबई उच्च न्यायालय खंडपीठ नागपूर येथून अटकपूर्व जमीन नाकारण्यात आला तरी सुद्धा या प्रकरणाचा तपास करीत असलेली सीआयडी यांनी मागील आठ महिन्यापासून आरोपींना अटक केली नाही. आरोपींनी अटकपूर्व जामीन मिळवण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न केले त्यामध्ये त्यांना यश आले नाही. तरी या ठिकाणी आरोपी हे पोलीस कर्मचारी नसते तर त्याला देशाच्या कोणत्याही कोपऱ्यातून कमीत कमी वेळात संबंधित यंत्रणांनी अटक केली असती परंतु पोलीस कर्मचारीच हे आरोपी असल्यामुळे यांना कुणाची मदत मिळत आहे का ? की सीआयडी याबाबतीत गंभीर नाही..सीआयडी सारखी तपास यंत्रणा या आरोपींच्या समोर हतबल झाल्याचे दिसून येते त्यामुळे अटक करण्यास अपयशी ठरलेल्या या तपास यंत्रणेवर पुन्हा एकदा प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे..

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

en_USEnglish