INDIA NEWS

Press

आ.भारसाकळे यांना गाव बंदीची सवय असली तरी यावेळी संपूर्ण तालुका बंदी करू..अकोली रुपराव येथील नागरिकांची संतप्त प्रतिक्रिया..

आ. प्रकाश भारसाकळे यांना गाव बंदीच नाही तर संपूर्ण तालुका बंदी करू..

महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुका अतिशय जवळ येऊन ठेपल्या आहेत त्या अनुषंगाने सर्वच मतदारसंघातील विद्यमान आमदार मतदारांना आकर्षित करण्यासाठी व स्वतःचा दबदबा कायम ठेवण्यासाठी संपूर्ण मतदारसंघ पिंजून काढत आहेत सोबतच वाट्टेल त्या ठिकाणी भूमिपूजन, उद्घाटन करून श्रेय घेण्याचा प्रयत्न करीत आहेत. याला अपवाद अकोट मतदार संघाचे विद्यमान आमदार प्रकाश भारसाकळे निश्चितच नाहीत.

तेल्हारा तालुक्यातील अकोली रूपराव येथे ग्रामस्थ आक्रमक..

प्रकाश भारसाकळे यांनी सुद्धा मतदार संघातील जिल्हा परिषद चे काम असो की ग्रामपंचायत या सर्व कामाचे श्रेय घेण्यासाठी उद्घाटन व भूमिपूजन करण्याचा सपाटा लावला आहे त्याकरिता विद्यमान खासदार अनुप धोत्रे यांनी सुद्धा या उद्घाटन प्रसंगी आवर्जून उपस्थिती दर्शवली. असाच एक उद्घाटन कार्यक्रम मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी योजना अंतर्गत आज अतिशय मोजक्या कार्यकर्त्यांच्या उपस्थितीत तेल्हारा तालुक्यातील अकोली रूपराव या ठिकाणी स्थानिकांच्या विरोधाला सामोरे जाण्याची हिंम्मत नसल्याने अतिशय घाई गडबडीत आ.भारसाकळे यांनी उरकून टाकला.

आमदाराच्या खेळीने भाजप कार्यकर्तेच नाराज..

परंतु या कार्यक्रमाची गावातील सरपंच किंवा इतर कुणालाही कानोकान खबर लागली नाही. कारण अकोली रूपराव येथील सरपंच संतोषी निखाडे यांनी आमदार प्रकाश भारसाकळे यांच्यावर गावकऱ्यांचा विश्वासघात करण्याचे थेट आरोप केले. सौर ऊर्जेच्या प्रकल्पासाठी जवळपास 35 एकर गायरान जमीन घेण्यासाठी ग्रामपंचायत कडून मान्यता व ठराव घ्यावा लागतो. त्यावेळी शासनाकडून हा प्रकल्प फक्त अकोली रूपराव या गावाकरिताच मर्यादित राहील सोबतच अकोली गावातील स्थानिक बेरोजगार तरुणांना या प्रकल्पामध्ये काम करण्याची संधी उपलब्ध करण्यात येईल अशा प्रकारची माहिती पटवून देण्यात आली होती. म्हणून गावकऱ्यांच्या मानगुटीवरचे भरमसाठ असलेले विज बिल हे कमी होऊन अखंडपणे वीज मिळणार याकरिता ग्रामपंचायत सरपंच संतोषी निखाडे यांनी कोणतेही राजकारण न करता गावाचा कायापालट होईल याकरिता तात्काळ या प्रकल्पासाठी मंजुरी देऊन गावाची 35 एकर जागा या प्रकल्पाला देण्याचा निर्णय घेतला परंतु आज अचानक उद्घाटन केलेल्या फलकावर व इतर सर्व जाहिरातींवर मौजे बेलखेड असा उल्लेख करण्यात आला त्यामुळे अकोली येथील गावकऱ्यांना भारसाकळे यांच्या कार्यपद्धतीवर संशय निर्माण झाला आहे. सरपंच निखाडे यांनी उद्घाटन केलेल्या फलकाजवळ धरणे देऊन जवळपास 200 गावकऱ्यांसह आक्रमक पवित्रा घेत हा प्रकल्प अकोली गावाकरिता होत नसल्यास बेलखेड करिता होणार असल्याचा आरोपच केला आहे.

आमदार प्रकाश भारसाकळे यांच्यावर संपूर्णपणे बहिष्कार..

तसेच उद्घाटनाला उपस्थित असलेले भाजपचे कार्यकर्ते यांनी सुद्धा आमदाराच्या या विश्वासघाताला प्रत्युत्तर दिल्या जाईल असा आक्रमक पवित्रा घेतला असून हा प्रकल्प अकोली गावापुरता मर्यादित असावा अन्यथा
आम्ही हा प्रकल्प होऊ देणार नाही आणि आ.भारसाकळे यांच्या नावाचे सर्व फलक उखळून फेकले जातील असा इशारा गावकऱ्यांनी दिला आहे..

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

en_USEnglish