अकोट पोलिसांनी 22 गोवंशांना दिले जीवदान.. तर भर चौकात सुरू असलेल्या वरली मटक्यामध्ये कुणाचे योगदान..
RaviRaj 6 Oct 2024
एकीकडे अकोट पोलिसांनी 2 ऑक्टोबर रोजी 27 पैकी पाच मृत गोवंश व 22 गोवंशांना जीवदान देऊन अतिशय उत्कृष्ट व दमदार कामगिरी चे दर्शन घडवले त्या अनुषंगाने अकोट पोलिसांचे सर्वत्र कौतुक होत आहे..परंतु दुसरीकडे अकोट शहरात मुख्य चौकात खुलेआम रस्त्यावर वरली, मटका,बेधडक सुरू आहे.पोलिसांचा कोणताही वचक या वर्लीबहाद्दरावर राहिलेला दिसत नाही. गोवंश तस्करीची एवढी मोठी कार्यवाही वरिष्ठांच्या मार्गदर्शनानुसार अकोट पोलिसांनी जीवाची बाजी लावून पार पडली त्याच वरिष्ठांच्या मार्गदर्शनाने शहरातील मुख्य रस्त्यावर दादागिरी करीत गाड्यांवर बसून खुलेआम वरलीच्या पट्ट्या भरल्या जातात..
वरलीबहाद्दरांच्या मनात कुणाचीही भीती राहिलेली नाही यांच्यामध्ये एवढी हिंमत येते कुठून शहराचा मुख्य रस्ता असल्यामुळे हिवरखेड परतवाडा मार्गावरील सर्व वाहनांना या वरली बहाद्दरांच्या गर्दीमुळे भरपूर मनस्ताप सहन करावा लागत आहे सोबतच आजूबाजूचे व समोरील व्यवसायिक सुद्धा या वरली बहाद्दरांच्या दादागिरीला कंटाळलेले असून कधीही सहनशक्तीचा उद्रेक होऊन आपापसात वाद निर्माण होण्याची शक्यता नाकारता येत नाही त्यामुळे शहरातील कायदा सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी कुणी पावले उचलावी हा यक्षप्रश्न उपस्थित झाला आहे. लोकांना भ्रमात ठेवण्यासाठी आलिशान ऑफिसच्या नावावर खाजगी व्यवसायाच्या पाट्या लावून त्याच्या आड वरली मटका व्यवसाय जोमाने सुरू आहे याकरिता पोलीस प्रशासनामधील वरिष्ठ अधिकाऱ्यांची सुद्धा मुक संमती असल्याचे बोलले जाते.
त्यामुळे पोलिसांवर वरली मटका सुरू ठेवण्यासाठी कुणाचा दबाव तर नाही ना..अकोट पोलीस या वरली बहाद्दरांसमोर हतबल का आहेत.अकोल्यातील एका प्रतिष्ठित मीडियाच्या दबावाखाली असे प्रकार घडत आहेत अशी खाजगी मध्ये पत्रकार बोलताना दिसतात म्हणूनच पोलीस वरली बहाद्दरांच्या मुस्क्या आवळण्यात अयशस्वी ठरले आहेत..अशा या पोलिसांच्या संशयास्पद असलेल्या दुटप्पी भूमिकेचे कौतुक करावे की निषेध याबाबत अकोटकर गोंधळलेले आहेत..