अकोट मतदार संघाची उमेदवारी कुणाला.! दोन आमदारांना कि तीन राजेशला..
RaviRaj 23 Oct 2024
महाराष्ट्राच्या इतिहासात यावेळी होत असलेल्या विधानसभा निवडणुका एक आगळा वेगळा अनुभव देऊन जात आहेत प्रत्येक घटक पक्षाच्या उमेदवाराला नेत्यांनी अस्वस्थ करून टाकलेले आहे. कुणी उमेदवार बदलत आहे तर कुणी पक्ष यादरम्यान महाविकास आघाडी व महायुतीमध्ये खूप मोठ्या प्रमाणात बंडखोरी चा सुळसुळाट बघायला मिळत आहे स्थानिक व पक्ष निष्ठेला डावलून आयात केलेल्या व घराणेशाहीला प्राधान्य देण्यात येत आहे. या घराणेशाहीमुळे तळागळातील पक्ष संघटन मजबूत करणारे निष्ठावान कार्यकर्ते हे मात्र नाहीसे होत चाललेले आहे यावेळी जर निष्ठावान कार्यकर्त्यांची दखल घेतली नाही तर महायुती असो की महाविकास आघाडीकडे एकही कार्यकर्ता उरणार नाही व यापुढील निवडणुकीपर्यंत पक्षवाढ व संघटन मजबूत करण्याकरिता एकही कार्यकर्ता शिल्लक राहणार नाही त्याचेच एक उदाहरण म्हणजे अकोला जिल्ह्यातील अकोट येथील आहे. या मतदारसंघात प्रकाश भारसाकळे यांना यावेळी उमेदवारी दिल्यास स्थानिक कार्यकर्ते सोबत राहणार नसून नेहमीप्रमाणे आयात केलेल्या कार्यकर्त्यांवर निवडणूक लढवावी लागेल तसेच शिवसेना वेगळी झाल्यामुळे या मतदारसंघात शिंदे सेनेचे अस्तित्व शून्य आहे त्यामुळे भारसाकळे यांना अति आत्मविश्वास चांगलाच भोवणार असल्याचे चित्र आहे महायुती ही अमोल मिटकरी यांना अकोट मतदार संघात उमेदवारी देण्याचा विचार करीत आहे परंतु अजित पवार यांच्या राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष कृष्णा अंधारे हे कार्यकर्ते तर सोडाच परंतु अकोट शहर ची कार्यकारणी सुद्धा पूर्ण करू शकले नाही. कुख्यात असलेला दंगलचा आरोपी जाकीर शाह याला शहराध्यक्ष पदाची धुरा द्यावी लागली अशी अजित दादाच्या राष्ट्रवादीची दयनीय अवस्था आहे त्यामुळे अमोल मिटकरी ला उमेदवारी दिल्यास दुसरा कोणताही पर्याय नसल्याने दंगल चा मुख्य आरोपी व अनेक महिलांची पिळवणूक करणार्या जाकीरशाह सोबतच प्रचार करावा लागणार आहे अशी महायुतीची बिकट अवस्था झालेली आहे त्यामुळे अकोट मतदार संघात विशेषता महायुती भाजप मधून स्थानिक व निष्ठावान कार्यकर्त्याला उमेदवारी न मिळाल्यास खूप मोठा स्पोट होण्याची शक्यता आहे महायुतीतील कार्यकर्त्याची अंतर्गत नाराजी ही बाहेरचा उमेदवार थोपल्यास उमेदवाराला पाडूनच शांत होईल अशी शपथच अनेक कार्यकर्त्यांनी घेतल्याची माहिती आहे अकोट मतदार संघात पक्ष संघटन मजबूत करणारे व ज्यांच्या रक्तात भाजप आहे असे राजेश नागमते, प्रा. राजेंद्र पुंडकर,राजेश पाचडे , डॉ महल्ले, डॉ अरविंद लांडे सारखे अनेक सक्षम उमेदवार असताना सुद्धा बाहेरच्या उपऱ्या उमेदवाराला उमेदवारी का दिली जाते असे अनेक प्रश्न उपस्थित होत आहेत .तसेच मतदार संघात सुद्धा स्थानिक व संकटाच्या वेळी उपलब्ध असणारा उमेदवारच देण्याची मागणी जोर धरत आहे त्यामुळे पक्षश्रेष्ठी कुणाला प्राधान्य देतात याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे..