आमदारापुढे अकोट पोलीस हतबल, कायदा मोडून विजयी मिरवणूक..
ललित बहाळे यांचा मिरवणुकीवर आक्षेप, बहाळे यांचे सर्वत्र कौतुक..
नुकत्याच संपलेल्या निवडणुकांमध्ये अकोट विधानसभा मतदारसंघात भाजपचे प्रकाश भारसाकळे हे विजयी झाले परंतु हौशी कार्यकर्त्यांसाठी परवानगी नसताना संपूर्ण शहरात भव्य अशी विजयी मिरवणूक काढण्यात आली अकोला जिल्हाधिकारी यांनी 149 ची नोटीस सर्व उमेदवारांना अगोदरच बजावली होती त्यामुळे प्रकाश भारसाकळे यांची मिरवणूक पूर्णपणे बेकायदेशीर होती अकोट पोलिसांनी कोणत्याही प्रकारची परवानगी या मिरवणुकीला दिलेली नसल्यामुळे एकमेव असे महापरिवर्तन आघाडीचे उमेदवार ललित बहाळे यांनी कायदा मोडून व जनसामान्यांना मानसिक त्रास होत असल्याने ही मिरवणूक थांबवण्याचा प्रयत्न केला
ललित बहाळे हे अभ्यासू व्यक्तिमत्व असून कायद्याचे जाणकार सुद्धा आहे अकोट सारख्या संवेदनशील शहरात एवढे सर्व उमेदवार असून एकाही उमेदवाराने या गैरकायदेशीर कृत्याला विरोध केला नाही परंतु एकमेव जनसामान्यांच्या वेदना समजून घेणारे ललित बहाळे यांनी तात्काळ विनापरवानगी असलेल्या गैरकायदेशीर मिरवणुकीला थांबवून मतदार संघाचे खरे नेतृत्व करण्याची क्षमता असल्याचे दर्शन घडवले बहाळे यांच्या या बेधडक कार्याची सर्वत्र कौतुकास्पद चर्चा होत असून कायदा हा सर्वांसाठी सारखा आहे की आमदारासाठी विशेष कायदा अकोट पोलिसांनी तयार केला आहे याचे स्पष्टीकरण आकोट पोलिसांनी देणे गरजेचे आहे अन्यथा पुढील काळात कुणालाच पोलिसांची परवानगी घेण्याची गरज नाही असा समज नागरिकांचा झालेला आहे तसेच विनापरवानगी असलेली मिरवणूक ही हतबल होऊन बघ्यांची भूमिका साकारणारे अकोट पोलीस गोरगरिबांनाच कायद्याचा धाक दाखवून स्वतःची पाठ थोपटून घेत आहेत..