अजित पवार राष्ट्रवादीचा शहराध्यक्ष पनवती.! दोन अपक्षाला पाडले तर तिसऱ्याने दूर लोटले..
RaviRaj 29 Nov 2024
महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुक ही ऐतिहासिक ठरली देशाच्या इतिहासातील सर्व रेकॉर्ड यावेळी तोडले गेले सर्व पक्षांना व दिग्गज नेत्यांना यावेळी आश्चर्याचा धक्का बसला आहे महायुतीच्या विरुद्ध जनमत असताना सुद्धा महायुतीचा विजय झाला. अकोला जिल्ह्यातील अकोट येथील निवडणुकीमधील चौरंगी लढत अतिशय चुरशीची होती यावेळी महायुतीमध्ये भाजप ,शिंदे गट व अजित पवार गट हे तिनही पक्ष सामील असून एकत्र लढले महायुतीचे अधिकृत उमेदवार प्रकाश भारसाकळे होते आ.भारसाकळे यांचा प्रचार करताना शिंदे गट शिवसेनेचे सर्व पदाधिकारी दिसत होते सोबतच राष्ट्रवादी अजित पवार गटाचे एकमेव असे तालुकाध्यक्ष राजेश भालतिलक यांनी युती धर्म कायम ठेवण्याचा प्रयत्न केला परंतु राष्ट्रवादी अजित पवार गटाचे जिल्हाध्यक्ष कृष्णा अंधारे यांनी मात्र ऐन वेळेवर पक्षाची उमेदवारी मिळाली नसल्याने बाळापुर मतदारसंघातून अपक्ष निवडणूक लढवली अंधारे यांचा प्रचार करण्यासाठी अकोट चा शहराध्यक्ष कुख्यात दंगलखोर असलेला जाकिर शाह रशीद शाह याला पाचारण करण्यात आले त्यामुळे अंधारे यांचे बाळापूर मतदारसंघातून डिपॉझिट जप्त झाले युती धर्माच्या नियमानुसार जाकीर शाह यांने प्रकाश भारसाकळे यांचा प्रचार करायला हवा होता परंतु जाकीर शहा याची पार्श्वभूमी ही दंगलखोराची असल्यामुळे भाजप कार्यकर्त्यांनी जाकीर शाह याला चार हात लांबच ठेवण्यात धन्यता मानली अखेर जाकीर शाहला राष्ट्रवादीच्या शहराध्यक्ष पदावर असताना सुद्धा दंगल मधील कुख्यात मुख्य आरोपी असल्याने कुणीच महत्त्व देत नव्हते कोणताही पर्याय नसल्याने अपक्ष उमेदवारांचा प्रचार करण्याचा प्रयत्न जाकीर शाह ने केला परंतु मतं वाढवण्याच्या प्रयत्नात अपक्ष उमेदवाराचे सुद्धा डिपॉझिट जप्त होण्यास जाकीर शहाचा खूप मोठा वाटा हा दिसून आला दंगलच्या आरोपामुळे जाकीर शहा ने दोन अपक्ष उमेदवारांचा पराभव केला अजित दादाच्या राष्ट्रवादीकडे दंगलखोरा शिवाय चांगल्या प्रतिमेचा दुसरा कोणताही सक्षम पदाधिकारी नसल्याने महायुती मधील दोनच पक्षावर अकोट मतदार संघाची मदार आहे. पुढील काळात बंडखोर कृष्णा अंधारे व कुख्यात दंगलखोर जाकीर शाह यांची काय भूमिका असणार याकडे सर्व जिल्ह्याचे लक्ष लागले आहे.