सरस्वती शाळेच्या अध्यक्षांना बातमीचा आधार..मुख्याध्यापक भूषण ठाकूर ची दहशत की आर्थिक हितसंबंध..
Raviraj 8 Feb 2025
खाजगी शाळांमध्ये नवनवीन उपक्रम राबवण्यासाठी अध्यक्ष तसेच मुख्याध्यापक यांनी पुढाकार घ्यायला हवा तसेच अध्यक्षाला सर्वस्वी अधिकार तशा प्रकारचे असतात परंतु सरस्वती विद्यालयाच्या बाबतीत वेगळाच प्रकार निदर्शनास येत आहे व्यवस्थापनामध्ये वाद सुरू असल्यामुळे त्या ठिकाणी विद्यमान दोन अध्यक्ष कार्यरत आहेत याचाच फायदा मुख्याध्यापक भूषण ठाकूर घेत आहे अध्यक्षांनी आदेश देऊन चांगल्या योजना चांगले उपक्रम राबवण्यासाठी मुख्याध्यापकाला पुढाकार घेणे गरजेचे आहे अध्यक्षांच्या आदेशाची अंमलबजावणी करण्याचे काम मुख्याध्यापकाची जबाबदारी असते परंतु सरस्वती विद्यालयांमध्ये उलट अध्यक्षाला मुख्याध्यापक भूषण ठाकूरची परवानगी घ्यावी लागत असल्याची चर्चा जोरदार सुरू आहे भूषण ठाकूर याची दहशत अध्यक्षांवर आहे की अध्यक्ष व मुख्याध्यापकांमध्ये आर्थिक हितसंबंध जोपासले गेले आहेत कारण सरस्वती शाळेमध्ये स्वतःची मुलं पत्नी व इतर नातेवाईक नोकरीत लावण्यासाठी जोरदार स्पर्धा सुरू आहे विद्यार्थ्यांचे व त्यांच्या पालकांच्या भावनांचा कोणीही विचार करत नाही शाळा जिवंत राहो अथवा न राहो कुणालाही संस्थेचे किंवा शाळेचे घेणे देणे उरले नाही स्वतःच्या स्वार्थासाठी कोणत्याही थरावर जाणारे हे सर्व व्हाईट कॉलर मंडळी यांना पुढील काळात विद्यार्थी व पालक मात्र माफ करणार नाहीत हे निश्चित?

बातमी नंतर दोन शिक्षक व सफाई कामगार रुजू
चार महिन्यापासून विद्यार्थ्यांचे जाणीवपूर्वक शैक्षणिक नुकसान
मुख्याध्यापक भूषण ठाकूरच्या कार्यपद्धतीवर प्रश्नचिन्ह
अकोट
सरस्वती विद्यालय मधील समस्यांचा उद्रेक होत असून दिवसेंदिवस अनेक नवनवीन फसवेगिरीच्या घटना समोर येत आहेत नेहमीप्रमाणेच 5 फेब्रुवारीला सरस्वती विद्यालयामध्ये शिक्षकांची कमतरता व वर्गखोल्या साफ करीत नसल्याची बातमी प्रकाशित केली होती तीन चतुर्थ श्रेणी चपराशी असून सुद्धा बाथरूम मधून सदैव दुर्गंधी येत असल्यामुळे विद्यार्थ्यांचे व शिक्षकांचे आरोग्य धोक्यात असल्याचे इंडिया न्यूज ने लावून धरले होते त्यामुळे तात्काळ बातमीची दखल घेऊन अध्यक्ष मोहन आसरकर यांनी मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजने अंतर्गत दोन शिक्षकांची नियुक्ती करून सफाई कामगार याला सुद्धा तात्काळ रुजू करून घेतले हीच प्रक्रिया मागील सहा महिन्यापूर्वी सुद्धा होऊ शकली असती परंतु विनयभंग गुन्ह्यातील आरोपी व जामीनावर बाहेर असलेला भूषण ठाकूर

याच्या मनमानी कारभारामुळे मागील सहा महिन्यापासून या शिक्षकांच्या नियुक्त्या जाणीवपूर्वक भूषण ठाकुर ने प्रलंबित ठेवल्या होत्या मागील चार महिन्यापासून गणित विज्ञान चा पिरेड होत नसल्यामुळे विद्यार्थ्यांचे अतोनात शैक्षणिक नुकसान झाले आहे ऐन परीक्षेच्या तोंडावर या शिक्षकाची नियुक्ती करून विद्यमान अध्यक्ष सुद्धा भूषण ठाकूरच्या मनमानी पुढे हतबल झाल्याचे स्पष्ट होते परंतु या शिक्षकांना रुजू करण्यासाठी मागील सहा महिन्यापासून विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होऊ नये याकरिता अध्यक्ष मोहन आसरकर हे आग्रही असल्याचे दिसून येते तसे प्रयत्न सुद्धा आसरकर यांनी सतत केले आहे परंतु भूषण ठाकूरच्या हेकेखोर स्वभाव व मुजोरीमुळे मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेला हुलकावणी दिली आहे तरी सरस्वती विद्यालयाच्या अध्यक्षांना चांगले उपक्रम राबविण्याकरिता बातमी चार आधार घ्यावा लागतो याची मात्र खंत सर्व शिक्षक व पालकांकडून व्यक्त केल्या जात आहे

प्रतिक्रिया
मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेअंतर्गत महाराष्ट्रातील सर्व शाळांनी शिक्षकांच्या नियुक्त्या करून या योजनेचा सन्मान केला आहे आमच्या शाळेत हे शिक्षक रुजू करण्याचा प्रयत्न मागील सहा महिन्यापासून सन्माननीय अध्यक्ष मोहनजी आसरकर यांनी सतत केला आहे तो प्रयत्न इंडिया न्यूज च्या बातमीमुळे आज यशस्वी झाला आहे परंतु संपूर्ण सत्र संपल्यानंतर ऐन परीक्षेच्या तोंडावर दोन सहकारी शिक्षकांची नियुक्ती झाली याचा आनंद व्यक्त करावा ही खंत हे समजत नाही त्यामुळे या चालू सत्रातील विद्यार्थ्यांचे झालेले अतोनात नुकसान हे न भरून निघणारे आहे
शिक्षक/शिक्षिका
सरस्वती विद्यालय अकोट