राजापेठ पोलीस स्टेशन अमरावती हद्दीत निर्घृण हत्या…..
प्रवीण झोलेकर
बिग ब्रेकिंग न्यूज
राजापेठ पोलीस स्टेशन हद्दीत येणाऱ्या दरोगा प्लॉट परिसर येथे राहणाऱ्या सचिन म्हैसकर वय 38 वर्ष राहणार दरोगा प्लॉट, याची अज्ञात ५ ते ७ हल्लेखोर यांनी हत्या केल्याची घटना घडली आहे. सचिनच्या नातेवाईक यांनी त्याला जवळच्या खाजगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले होते. मात्र डॉक्टर यांनी त्याला मृत घोषित केले आहे. घटनेची माहिती मिळतात राजापेठ पोलीस स्टेशनची कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले आहेत. तसेच ठाण्याचे पोलीस पथक अज्ञात आरोपीच्या शोध मोहिमेत लागले आहे .
नेमके हत्येचे कारण अद्याप स्पष्ट झाले नाही