शुल्लक कारणावरून झालेला वाद जीवावर बेतला
५ ते ६ युवकांनी केली इसमाची हत्या*३ आरोपी पोलिसांच्या ताब्यात***
प्रवीण झोलेकर
अमरावती शहरातील एका 38 वर्षीय युवकाची शिल्लक कारणावरून राजापेठ पोलीस स्टेशन हद्दीत येणाऱ्या दरोगा प्लॉट इथे एका युवकाचे निर्घृण हत्या केल्याची घटना गुरुवारी रात्री एक वाजता च्या दरम्यान समोर आली आहे. याप्रकरणी राजापेठ पोलिसांनी तीन आरोपी अटक केली. असून अन्य आरोपींचा शोध राजापेठ पोलीस घेत आहे. मिळालेल्या माहितीनुसार सचिन म्हैसकर 38 नामक युवक हा त्याच्या दुचाकीने बाहेर निघाला असता यातील आरोपी रवी अशोक इंगोले याला मृतक सचिन च्या गाडीचा धक्का लागल्याने या दोघात वाद झाला दरम्यान मृतकाने आरोपी रवी इंगोले याला झापड मारलीस व तिथून निघून गेला मात्र आरोपी रवी इंगोले यांनी त्याच्या अन्य पाच ते सहा मित्रांना फोन करून दरोगा प्लॉट इथेे बोलावून घेतले व रात्री एक वाजता दरम्यान मृतक सचिन हा घरी परत येत असता आरोपी यांनी मृतक सचिन यास दरोगा प्लॉट येथे अडवून त्याला रॅप्टरने मारहाण केली. व यातील दोन आरोपींनी मृतक सचिन याच्यावर चाकूने वार करी करीत त्याची हत्या केली. व घटनास्थळावरून पळून गेले या हत्याप्रकरणी राजापेठ पोलिसांनी रवी अशोक इंगोले आकाश देविदास विघ्ने व यश संजय गायगुले या तीन आरोपींना अटक केली असून या आरोपींना 4 दिवसाची पोलीस कोठडी न्यायालयाने सुनावली आहेत. तर अन्य आरोपितांचा शोध राजापेठ पोलीस घेत आहे.