INDIA NEWS

Press

पत्रकार की वरली बहाद्दर.. अवैध धंद्यांकरिता पत्रकारितेची जोड..अकोला पोलिसांना सुपीक..

अवैध धंद्यांसमोर हतबल असलेले अकोला पोलीस अधीक्षक बच्चन सिंग, अकोट उपविभागीय पोलीस अधिकारी अनमोल मित्तल व तेल्हारा पोलीस स्टेशनचे ठाणेदार प्रमोद उलेमाले..

Akot: अवैध धंदे करण्यासाठी आज-काल पत्रकारितेची जोड लावून अनेक पत्रकार या व्यवसायात उतरले आहेत सोबतच पोलिसांना सुद्धा हप्ते वसुलीसाठी हक्काचे व्हाईट कॉलर पत्रकार माध्यमातून मिळाले आहेत त्यामुळे पोलिसांचे चांगलेच फोफावले आहे पत्रकारांना हाताशी धरून अवैध धंद्यांना प्रोत्साहन देऊन पोलीस अनेकांचे संसार उध्वस्त करीत आहेत अकोट तालुक्यात वरली बहाद्दर असलेला पत्रकार ज्याला बातमी सुद्धा लिहिता येत नाही असा पत्रकार अनेक अवैध धंद्याशी जुळलेला आहे ” पोलीस माझे काहीच करू शकत नाहीत अशा तोऱ्यात असणारा ” एकमेव शहर प्रतिनिधी म्हणून समाजात वावरत आहे नामांकित असलेले सिटी न्यूज सुपरफास्ट दैनिकाच्या मालकाचा हात डोक्यावर असल्यामुळे हा सर्व प्रकार आकोट तालुक्यात घडत आहे त्यामुळे अनेक तक्रारी या शहर प्रतिनिधीच्या विरोधात पोलिसात केल्यावरही पोलीस मात्र या वरली बहाद्दर पत्रकार समोर हतबल आहे एवढेच नव्हे तर सिटी न्यूज सुपरफास्ट चे मालक सुद्धा या दैनिकाच्या माध्यमातून या वरली बहादराला संरक्षण का देत आहेत असा प्रश्न उपस्थित होत असून सर्वत्र अकोट तालुक्यात चर्चेला उधाण आले आहे त्यामुळे अनेकांचे संसार वाचवण्यासाठी या पत्रकार वरली बहाद्दरांचा कायमस्वरूपी बंदोबस्त करण्यासाठी थेट पोलीस महासंचालक मुंबई यांच्याकडे आरपीआयचे तालुकाध्यक्ष यांनी तक्रार केली आहे यावर अकोला पोलीस व सिटी न्यूज सुपरफास्ट चे संचालक यावर काय भूमिका घेतात हे बघणे औत्सुक्याचे ठरेल यादरम्यान पुन्हा असाच प्रकार तेल्हारा पोलीस स्टेशन अंतर्गत सुद्धा झालेला आहे रौंदळा येथील दारूचा अवैध धंदा करणाऱ्या सागर अबगड याने तर थेट तेल्हारा पोलीस माझ्या खिशात असून “अकोला पोलीस माझे काहीच करू शकत नाहीत अशा प्रकारचे आव्हानच करून टाकले आहे ”

Deepak dabhade 24 April 2025

अकोट

अकोला पोलीस अवैध धंदे बंद करू शकत नाही असा प्रबळ आत्मविश्वास जिल्ह्यातील सर्वच अवैध धंदे करणारे बहाद्दर यांना आहे अकोला पोलीस अधिक्षक बच्चन सिंग यांनी अकोल्याचा अधिक्षक पदाचा प्रभार घेतल्यानंतर सुरुवातीला त्यांच्या कठोर निर्णयाचे स्वागत अकोला वाशीयांनी केले परंतु काही काळानंतर नेहमीप्रमाणे बच्चन सिंग यांनी सुद्धा अवैध धंद्यांना शिथिलता देऊन जनतेचा गैरसमज दूर केला बच्चन सिंग यांच्यापासून अवैध धंद्याला कंटाळलेले नागरिक यांना हे अवैध धंदे कायमस्वरूपी बंद होतील अशा खूप अपेक्षा होत्या परंतु त्यांची काही दिवसातच निराशा झाली

असाच प्रकार रौंदळा गावात सुरू आहे तेल्हारा पोलीस स्टेशन अंतर्गत असलेल्या रौंदळा गावातील अवैध दारूचा व्यवसाय करणारा सागर शंकर अबगड याने तर खुले गावकऱ्यांना आव्हानच दिले आहे की माझा दारूचा व्यवसाय कुणीच बंद करू शकत नाही तेल्हारा येथील ठाणेदार उलेमाले यांना न चुकता अवैध धंद्याचा हप्ता चुकवावा लागतो तर उपविभागीय पोलीस अधिकारी अनमोल मित्तल च नव्हे तर पोलीस अधीक्षक बच्चन सिंग सुद्धा दारूचा अवैध धंदा बंद करू शकत नाहीत अशा स्वरूपाची तक्रार रौंदळा येथील गावकऱ्यांनी नोव्हेंबर 2024 मध्येच अकोला पोलिसांना दिली

परंतु याची कोणतीही दखल अकोला पोलिसांनी घेतली नाही रौंदळा येथील गावकऱ्यांनी विशेषता महिला मंडळींनी एकत्रित येऊन अशा प्रकारचा ग्रामपंचायतचा ठराव सुद्धा मंजूर करून घेतला संबंधित पोलीस स्टेशन तेल्हारा येथील ठाणेदार उलेमाले यांना ठराव देऊन अनेक महिलांनी या अवैध धंद्या विरोधात तक्रार सुद्धा दिली परंतु अवैध धंद्यांसमोर हतबल असलेले पोलीस मात्र बघ्याची भूमिका घेत आहेत या तक्रारीनंतर सागर अबगड आक्रमक झाला असून तक्रार देणाऱ्या सर्व गावकऱ्यांना कुऱ्हाडीने तोडून टाकण्याची धमकी देत आहे

अवैध धंद्ये व वरली बहाद्दर पत्रकारांना अभय देणारे अकोटचे उपविभागीय पोलीस अधिकारी अनमोल मित्तल

त्यामुळे गावकरी भयभीत झाले आहेत मागील चार महिन्यापासून सर्व तक्रारीवर सही करणारे गावकरी दहशती खाली जगत आहेत भविष्यात या वादाला खूप मोठे स्वरूप येण्याची शक्यता आहे परंतु ठाणेदार उलेमाले यांना फक्त अवैध धंद्याचे हप्ते वसूल करण्यातच रस असल्याचे दिसून येते सोबतच चार महिन्यापासून तक्रारीवर कोणतीही कारवाई पोलिसांकडून झाली नाही याचाच अर्थ वरिष्ठांचा सुद्धा आशीर्वाद या अवैध धंद्यांना लाभला आहे म्हणूनच आत्मविश्वासाने अवैध धंदे करणारे हे खुलेआम धमक्या देऊन दादागिरी करीत पोलिसांना सुद्धा चॅलेंज करताना दिसतात पोलीस मात्र फक्त हप्ते खोरीसाठी या चिल्लर अबगड सारख्या लोकांना डोक्यावर बसून आणखी किती खालची पातळी गाठणार याचे आश्चर्य व्यक्त होत आहे

परंतु यापुढे रौंदळा येथील गावकऱ्यांची सहनशक्ती संपलेली असून आक्रमक पवित्रा घेऊन तेल्हारा पोलीस स्टेशन समोर धरणे आंदोलन करणार असल्याचे गावकऱ्यांनी ठरवले आहे याकरिता जेलभरो आंदोलन करण्याची तयारी सुद्धा ग्रामस्थांनी दर्शवली आहे तरी या अतिशय महत्त्वाच्या तक्रारीची दखल अकोला पोलीस गंभीरतेने घेतील का ? असा यक्षप्रश्न उपस्थित होत आहे

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

en_USEnglish